लखीमपूर खीरी, 31 डिसेंबर : देशात दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. अनैतिक संबंधातून हत्या, बलात्कार तसेच आत्महत्येच्याही घटना घडत आहेत. त्यातच आता एका हत्येप्रकरणी धक्कादायक खुलासा झाला आहे. एका पत्नीने आपल्या प्रियकारच्या मदतीने आपल्या पतीची हत्या केली आहे. प्रियकराच्या मदतीने कुऱ्हाडीने वार करत पतीची हत्या केल्यावर त्याच्या मृतदेहाला रस्त्याच्या बाजूला गाडले. 11 दिवसांनी मृत व्यक्तिचा मृतदेह मिळाल्यानंतर या भयंकर घटनेचा खुलासा झाला आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी पत्नी आणि तिच्या प्रियकराला अटक केली आहे. काय आहे संपूर्ण प्रकरण - ही धक्कादायक घटना उत्तरप्रदेशच्या लखीमपुर खीरी येथील आहे. लखीमपूर खेरी येथील बुद्धि पुरवा गावातील या घटनेने पोलिसांनाही धक्का बसला आहे. अधिकारी संजयनाथ तिवारी यांनी सांगितले की, 11 दिवसांपासून बेपत्ता असलेल्या इंग्लिश (28) या तरुणाचा मृतदेह रस्त्याच्या कडेला पुरलेला आढळून आला. सिंगाही व निघासन लिंक रोडलगतच्या रस्त्यावर लोकांना विचित्र वास येत होता. त्यामुळे लोकांनी स्थानिक पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून रस्त्याच्या कडेला खोदकाम सुरू केले असता त्यांना गळा कापलेला मृतदेह आढळून आला. नंतर त्याची ओळख बुद्धि पुरवा येथील रहिवासी असलेल्या इंग्लिश नावाचा तरुण म्हणून झाली. गेल्या 11 दिवसांपासून तो घरातून बेपत्ता होता. नातेवाईक त्याचा शोध घेत होते. मात्र, त्याचा काहीही पत्ता लागला नाही. मृतदेह सापडल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास केला असता, त्यांना इंग्लिशची पत्नी ज्युली हिच्यावर संशय आला. यानंतर पोलिसांनी ज्युलीची कडक चौकशी केली असता तिने सर्व काही कबुली दिली. जुलीच्या तोंडून घटनेचा खुलासा ऐकल्यावर पोलिसांच्या पायाखालची जमीनच सरकली. ज्युलीने सांगितले की, इंग्लिश तिला तिच्या प्रियकराला भेटण्यापासून रोखत असे. त्यामुळेच तिने प्रियकरासह आधी पतीला कुऱ्हाडीने वार केले. तसेच पतीची हत्या केल्यावर त्याचा मृतदेह रस्त्याच्या कडेला नेऊन पुरला. हेही वाचा - आई म्हणाली, त्याच्यासोबत संबंध ठेवू नकोस…, मुलीने प्रियकरासोबत मिळून केला तिचाच गेम तर मृताचे काका मेवालाल यांनी सांगितले की, त्यांचा पुतण्या 11 दिवसांपूर्वी बेपत्ता झाला होता. नातेवाइकांनी सतत त्याचा शोध घेतला मात्र त्याचा कोणताही सुगावा लागला नाही. आता त्याचा मृतदेह रस्त्याच्या कडेला पुरलेला आढळून आला आहे. त्याच्या मानेवर कुऱ्हाडीने वार करण्यात आले. त्यांच्या पुतण्याची हत्या करण्यात आली आहे. पोलीस या प्रकरणाची चौकशी करत आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.