मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /मुलगी अपशकुनी समज करून जन्मदात्या आई-बापानेच छळले, अखेर चिमुरडीने सोडला जीव!

मुलगी अपशकुनी समज करून जन्मदात्या आई-बापानेच छळले, अखेर चिमुरडीने सोडला जीव!

कनीजचा जन्म झाला, त्यावेळी तिच्या आजीचे निधन झाले होते. त्यानंतर 2 वर्षांनी जावीदच्या मेडिकल दुकानाला आग लागली होती. या दोन्ही घटनांमुळे...

कनीजचा जन्म झाला, त्यावेळी तिच्या आजीचे निधन झाले होते. त्यानंतर 2 वर्षांनी जावीदच्या मेडिकल दुकानाला आग लागली होती. या दोन्ही घटनांमुळे...

कनीजचा जन्म झाला, त्यावेळी तिच्या आजीचे निधन झाले होते. त्यानंतर 2 वर्षांनी जावीदच्या मेडिकल दुकानाला आग लागली होती. या दोन्ही घटनांमुळे...

इम्तियाज अली, प्रतिनिधी

जळगाव, 29 एप्रिल: अपशकुनी असल्याचा समज करून घेत एका अल्पवयीन मुलीचा जन्मदाते आई-वडील जन्मापासून अनन्वित छळ करत होते. या निर्दयी आई-वडिलांनी मुलीला अन्न व पाणी दिले नाही, तिला आंघोळ न करू दिल्याने शारीरिक व्याधी जडल्या. अखेर या मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाला. मन हेलावून टाकणारी ही घटना जळगाव (Jalgaon) शहरातील रामानंदनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पिंप्राळा हुडको भागात घडली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार,  कनीज फातेमा शेख जावीद अख्तर (वय 11) असं मृत्यू झालेल्या मुलीचे नाव आहे. तिच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी पोलिसांनी वडील जावीद अख्तर आणि आई नाजीया परवीन यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

Oxygen Crisis: टाटांनी पुन्हा वाढवला ऑक्सिजनच पुरवठा,600 टन ऐवजी पुरवणार 800 टन

जावीद अख्तर हा व्यवसायाने केमिस्ट आहे. त्याचा एक भाऊ डॉक्टर तर दुसरा वकील आहे. कनीजचा जन्म झाला, त्यावेळी तिच्या आजीचे निधन झाले होते. त्यानंतर 2 वर्षांनी जावीदच्या मेडिकल दुकानाला आग लागली होती. या दोन्ही घटनांमुळे कनीज ही अपशकुनी असल्याचा समज जावीदने केला होता. तेव्हापासून तिला डांबून ठेवणे, जेवण न देणे, मारहाण करणे अशा प्रकारे तिचा छळ सुरू होता.

तिची अवस्था बघवली जात नसल्याने तिच्या आजी-आजोबांनी तिला आजोळी अमळनेर येथे आणले होते. याठिकाणी ती 2 ते 3 वर्षे राहिली. नंतर भेटण्याच्या बहाण्याने तिला आई-वडिलांनी परत घरी आणले होते. सध्या ती जळगावात पिंप्राळा-हुडकोत आई-वडिलांकडे राहत होती.

‘लस घ्या अन् सुरक्षित व्हा’; जेनेलियानं मानले आदित्य ठाकरेंचे आभार

मृत्यूनंतर मुलीचा परस्पर दफनविधी करण्यात आला होता या घटनेनंतर तिच्या मामाने पोलिसांत तक्रार केली. त्यानंतर पोलीस तपासात हे प्रकरण समोर आला आहे.  या घटनेप्रकरणी त निर्दयी माता-पित्यावर बुधवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेनं जळगावात खळबळ उडाली आहे.

First published:

Tags: Crime, Jalgaon, Maharashtra, जळगाव