मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

‘लस घ्या अन् सुरक्षित व्हा’; जेनेलियानं मानले आदित्य ठाकरेंचे आभार

‘लस घ्या अन् सुरक्षित व्हा’; जेनेलियानं मानले आदित्य ठाकरेंचे आभार

अभिनेत्री जेनेलिया देशमुख (Genelia D'Souza Deshmukh) हिनं आनंद व्यक्त केला आहे. तिनं सरकारच्या निर्णयाचं स्वागत करत त्यांच्यावर स्तुतीसुमनं उधळली आहेत.

अभिनेत्री जेनेलिया देशमुख (Genelia D'Souza Deshmukh) हिनं आनंद व्यक्त केला आहे. तिनं सरकारच्या निर्णयाचं स्वागत करत त्यांच्यावर स्तुतीसुमनं उधळली आहेत.

अभिनेत्री जेनेलिया देशमुख (Genelia D'Souza Deshmukh) हिनं आनंद व्यक्त केला आहे. तिनं सरकारच्या निर्णयाचं स्वागत करत त्यांच्यावर स्तुतीसुमनं उधळली आहेत.

  • Published by:  Mandar Gurav

मुंबई 29 एप्रिल: महाराष्ट्र सरकारनं सर्वांना मोफत लसीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. (Thackeray Government) 28 एप्रिल रोजी राज्य मंत्रिमंडळाच्या झालेल्या बैठकीमध्ये 18 ते 44 या वयोगटातील लोकांसाठी मोफत लसीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला. (Free vaccination for Maharashtra citizens) यापूर्वी ४५ वर्षांवरील सर्वांना मोफत लसीकरण केलं जात होतं. कॅबिनेट मंत्री आदित्य ठाकरे यांनी ट्विटरद्वारे ही महत्वाची महिती दिली. दरम्यान त्यांच्या या ट्विटवर अभिनेत्री जेनेलिया देशमुख (Genelia D'Souza Deshmukh) हिनं आनंद व्यक्त केला आहे. तिनं सरकारच्या निर्णयाचं स्वागत करत त्यांच्यावर स्तुतीसुमनं उधळली आहेत.

“सरकारच्या निर्णयाचं स्वागत. कृपया लसीकरण करा. कोरोनाचा सामना करताना ही लसच आपलं संरक्षण करणार आहे.” अशा आशयाचं ट्विट करुन जेनेलियानं महाराष्ट्र सरकारच्या निर्णयावर आनंद व्यक्त केला आहे. तिचं हे ट्विट सध्या सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे.

‘पोकळ बडबड थांबव अन् ऑक्सिजन पुरव’; राखी सावंतनं घेतला कंगनाशी पंगा

18 ते 44 वयोगटातील नागरिकांचे मोफत लसीकरण

राज्यमंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी म्हटलं, "आज राज्य मंत्रिमंडळाने (Maharashtra Cabinet) निर्णय घेतला आहे की, राज्यातील 5 कोटी 71 लाख (18 ते 44 वयोगटातील) नागरिकांना मोफत लसीकरण करायचं. त्यामुळे अंदाजे दोन कोटी लशींचे डोस राज्य सरकारला विकत घ्यावे लागणार आहेत त्यासाठी साधारणत: 6 हजार 500 कोटी रुपये खर्च येणार आहे."

लसीकरणात महाराष्ट्राची आघाडी

लसीकरणात महाराष्ट्र राज्य हे देशात सातत्याने अग्रस्थानी आहे. राज्यात आतापर्यंत 1 कोटी 53 लाख 37 हजार 382 नागरिकांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. गुजरात, राजस्थान, उत्तरप्रदेश या राज्यांच्या कैकपटीने महाराष्ट्र पुढे आहे. कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणात राज्य पहिल्यापासूनच अग्रेसर आहे. कोरोनाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर राज्यात लसीकरणाला वेग देण्यासाठी सध्या होत असलेल्या लसीकरणाच्या दुप्पट संख्येने लसीकरण करण्याचे उद्दीष्ट ठेवण्यात आले असून अशाच पद्धतीने लसीकरणाला वेग दिल्यास लवकर राज्यात दिवसाला आठ लाखांहून अधिक नागरिकांचे लस देण्याचे उद्दिष्ट गाठता येईल असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी म्हटले आहे.

First published:

Tags: Aaditya thackeray, Ritesh deshmukh, Vaccinated for covid 19