Home /News /crime /

प्रसिद्ध मॉडेलची घरात घुसून निर्घृण हत्या; बाथरूमची खिडकी तोडून आत आले आरोपी अन्...

प्रसिद्ध मॉडेलची घरात घुसून निर्घृण हत्या; बाथरूमची खिडकी तोडून आत आले आरोपी अन्...

29 वर्षीय नायब नदीम हिचा गळा आवळून खून करण्यात आला (Pakistani Model Nayab Found Dead at Home) आहे. मात्र, या प्रकरणी अधिक माहिती देण्यास पोलिसांनी नकार दिला आहे.

    कराची 12 जुलै : पाकिस्तानात महिलांविरोधातील गुन्ह्यांमध्ये (Crime in Pakistan) दिवसेंदिवस वाढ होत आहे. अशात आता आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेत लाहोरमधील एका मॉडेलची तिच्याच घरात घुसून निर्घृण हत्या करण्यात आली आहे. पोलिसांना असा संशय आहे, की 29 वर्षीय नायब नदीम हिचा गळा आवळून खून करण्यात आला (Pakistani Model Nayab Found Dead at Home) आहे. मात्र, या प्रकरणी अधिक माहिती देण्यास पोलिसांनी नकार दिला आहे. नायबचा मृतदेह तिच्या डिफेंस एरियामधील (Defence Area) घरातून ताब्यात घेण्यात आला आहे. पाकिस्तानी वृत्तपत्र डॉनच्या वृत्तानुसार, नायबच्या भावानं याबाबत पोलिसांत तक्रार दिली आहे. यानंतर प्रकरणाचा तपास सुरू झाला आहे. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी म्हटलं, की गळा दाबून मॉडेलची हत्या केल्याचा संशय आहे, मात्र शवविच्छेदन रिपोर्ट समोर आल्यानंतरच घटनेचा खुलासा होऊ शकेल. लोणावळ्यात पर्यटकांचा दारु पिऊन तमाशा, फोडल्या पोलीस चौकीच्या काचा नायब नदीमचा (Nayab Nadeem) भाऊ मोहम्मद अली यानं सांगितलं, की 9 जुलै रोजी मध्यरात्री तो आपल्या बहिणीच्या घरी गेला होता. यावेळी त्यानं पाहिलं की नायबचा मृत्यू झाला असून ती जमिनीवर कोसळलेली होती. तिच्या मानेवर जखमा होत्या. अलीनं म्हटलं की नायबच्या बाथरुमची खिडकी तुटलेली होती. यामुळे आरोपी याच मार्गानं घरात घुसल्याचा अंदाज आहे. पोलिसांचं असं म्हणणं आहे, की अली नेहमीच आपल्या बहिणीची चौकशी कऱण्यासाठी तिच्या घरी येत-जात असे. फक्त 120 रुपयांसाठी चोरी, चोरीचं कारण ऐकून तुम्हालाही बसेल धक्का नायब नदीम हिचं लग्न झालेलं नव्हतं आणि घरात ती एकटीच राहात होती. मे महिन्यातही मूळची पाकिस्तानची असलेल्या ब्रिटिश महिलेची लाहोरमध्ये हत्या झाली होती. या महिलेचा मृतदेही घरातून ताब्यात घेण्यात आला होता. 25 वर्षीय माया एका लग्नसमारंभासाठी ब्रिटनमधून पाकिस्तानात आली होती आणि आपल्या मैत्रिणीसोबत राहत होती. आरोपींनी घरात घुसून तिच्यावर गोळ्या झाडल्या होत्या.
    Published by:Kiran Pharate
    First published:

    Tags: Crime news, Model, Murder news, Pakistan

    पुढील बातम्या