• Home
 • »
 • News
 • »
 • pune
 • »
 • लोणावळ्यात पर्यटकांचा दारु पिऊन धिंगाणा; पोलिसांच्या चौकीच्या फोडल्या काचा, चौघांना अटक

लोणावळ्यात पर्यटकांचा दारु पिऊन धिंगाणा; पोलिसांच्या चौकीच्या फोडल्या काचा, चौघांना अटक

Pune crime:पुण्यात (Pune) दारुच्या नशेत (Drunken Tourist) चार पर्यटकांनी धुडगूस घातला आहे. या मद्यपींनी दारुच्या नशेत पोलिसांच्या चौकीच्या काचाही फोडल्या आहेत.

 • Share this:
  पुणे, 12 जुलै: पुण्यात (Pune corona cases) कोरोनाचा संसर्ग आटोक्यात आणण्यासाठी पर्यटनस्थळावर कडक अंमलबजावणीचे आदेश पुण्याचे पालकमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी दिले. आदेशानंतरही पर्यटन स्थळावर मोठ्याप्रमाणात गर्दी झालेली पाहायला मिळाली. अशातच पुण्यात (Pune) दारुच्या नशेत (Drunken Tourist) चार पर्यटकांनी धुडगूस घातला आहे. या मद्यपींनी दारुच्या नशेत पोलिसांच्या चौकीच्या काचाही फोडल्या आहेत. सार्वजनिक ठिकाणी धिंगाणा घालणाऱ्या चार पर्यटकांविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. मुंबई-पुणे महामार्गावर मद्याच्या नशेत भरधाव मोटार चालवणे, तसंच सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान करणे या गुन्ह्यांखाली धिंगाणा घालणाऱ्या चारही पर्यटकांना पोलिसांनी अटक केली आहे. गणेश संभाजी साळवे (24), सुनीत संभाजी साळवे (22), नवनाथ संभाजी साळवे (30, रा. नाणेकरवाडी, चाकण-तळेगाव रस्ता, जि. पुणे), रामदास बबन औटे (30, रा. गणेगाव, शिरूर, जि. पुणे) अशी अटक करण्यात पर्यटकांची नावे आहेत. हेही वाचा- फक्त 120 रुपयांसाठी चोरी, चोरीचं कारण ऐकून तुम्हालाही बसेल धक्का शनिवारी मुंबई पुणे महामार्गावरुन आरोपी वेगानं कार चालवत होते. लोणावळ्यातील एवन चिक्की चौकात त्यांनी कार थांबवून धिंगाणा घातला. दारुच्या नशेत या टोळक्‍यानं वाहतूक पोलिसांच्या चौकीच्या काचा फोडल्या. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी कुमार चौकात या मद्यपींची कार अडवली. कारचालक नवनाथ साळवे दारु पिऊन कार चालवल्याचं पोलिसांच्या निदर्शनास आलं. पोलिसांनी चौघांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी केली. यावेळी गणेश साळवेनं चौकीची काच फोडल्याचं कबूल केलं. त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणी पुढील कारवाई केली.
  Published by:Pooja Vichare
  First published: