Home /News /crime /

उदयपूर हत्याकांडासाठी आरोपीनं पाकिस्तानात जाऊन घेतलं ट्रेनिंग; चौकशीत धक्कादायक खुलासे

उदयपूर हत्याकांडासाठी आरोपीनं पाकिस्तानात जाऊन घेतलं ट्रेनिंग; चौकशीत धक्कादायक खुलासे

या बैठकीला रियाझ, मोहम्मद घौस, आसिफ आणि मोहसीन उपस्थित होते. कन्हैयालालच्या दुकानापासून अवघ्या काहीच अंतरावर असलेल्या मोहसीनच्या दुकानात आणि शेजारीच असलेल्या आसिफच्या खोलीत हत्येचा कट रचला गेला.

    जयपूर 03 जुलै : उदयपूरमधील कन्हैयालाल हत्या प्रकरणाच्या तपासात मोठा खुलासा झाला आहे (Kanhaiyalal Murder Case). उदयपूरच्या रियासत हुसैन आणि अब्दुल रज्जाक या दोन मौलवींनी हत्येतील आरोपी मोहम्मद घौस याला दावत-ए-इस्लामीच्या प्रशिक्षणासाठी पाकिस्तानला पाठवलं होतं. घौस याच्यासोबत वसीम अत्तारी आणि अख्तर रझा हे पाकिस्तानला गेले होते. तिघांनाही एनआयएने ताब्यात घेतलं आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन मौलाना आणि दोन वकीलही या कटात सहभागी आहेत, त्यांनाही ताब्यात घेण्यात आलं आहे. आरोपींची एक बैठक झाली होती ज्यामध्ये रियाझ अत्तारीने टेलर कन्हैयालालच्या हत्येची जबाबदारी घेतली होती (Udaipur Murder Case). अमरावतीतील हत्येचा मास्टरमाइंड अखेर अटक; CCTV फुटेज समोर आल्यानंतर मोठी कारवाई या बैठकीला रियाझ, मोहम्मद घौस, आसिफ आणि मोहसीन उपस्थित होते. कन्हैयालालच्या दुकानापासून अवघ्या काहीच अंतरावर असलेल्या मोहसीनच्या दुकानात आणि शेजारीच असलेल्या आसिफच्या खोलीत हत्येचा कट रचला गेला. टेलर कन्हैयालाल हत्या प्रकरणातील चार आरोपींना शनिवारी एनआयए न्यायालयात हजर करण्यात आलं. या हत्येत सहभागी असलेल्या रियाझ, मोहम्मद घौस या दोन आरोपींना पोलिसांनी यापूर्वीच अटक केली होती. दोन्ही आरोपींनी हत्येनंतरचा व्हिडिओ शेअर केला होता. यानंतर राजस्थान एटीएसने शुक्रवारी आणखी दोन आरोपी मोहसीन आणि आसिफ यांना अटक केली. रियाझने आसिफ आणि मोहसीन यांना या घटनेत साथ देण्यासाठी तयार केलं होतं. कन्हैया लालच्या हत्येच्या प्लॅनिंगपासून ते शस्त्रे बनवण्याच्या कटात आसिफ आणि मोहसीनचा सहभाग होता. ज्या गल्लीत कन्हैया लालचं दुकान होतं, त्या गल्लीत रियाझ आणि मोहम्मद घौस यांचं येणं-जाणं होती. सर्वांना वेगवेगळ्या खोलीत थांबवलं, घरातील दिवे घालवले; मांत्रिकाने एक एक करीत वनमोरे कुटुंबातील 9 जणांना संपवलं उदयपूरमध्ये जेव्हा काही लोकांनी नुपूर शर्मा यांच्या वादग्रस्त विधानाचं समर्थन करण्यास सुरुवात केली, तेव्हाच रियाझ आणि मोहम्मद घौस यांनी ठरवलं होतं की काहीतरी मोठं करायचं. त्यांच्या या प्लॅनसाठी कन्हैया त्यांना सोपी शिकार वाटली. रियाझ आणि मोहम्मद घौस यांची कन्हैयाच्या दुकानाजवळून आधीच ये-जा सुरू असायची आणि त्यांना त्या रस्त्याची माहिती असल्याने त्यांनी ही हत्या केली. उदयपूरमध्ये 28 जून रोजी दुपारी मोहम्मद रियाज आणि गौस मोहम्मद या दोन तरुणांनी टेलर कन्हैयालालवर धारदार शस्त्राने वार करून त्याची हत्या केली होती. आरोपी कपडे शिवण्याच्या बहाण्याने दुकानात आले होते. यानंतर दोन्ही आरोपींनी व्हिडिओ शेअर करत इस्लामच्या अपमानाचा बदला घेण्यासाठी कन्हैयालालची हत्या केल्याचं सांगितलं. एवढंच नाही तर आरोपींनी पीएम मोदींनाही धमकावलं.
    Published by:Kiran Pharate
    First published:

    Tags: Crime news, Murder news

    पुढील बातम्या