Home /News /maharashtra /

अमरावतीतील हत्येचा मास्टरमाइंड अखेर अटक; CCTV फुटेज समोर आल्यानंतर मोठी कारवाई

अमरावतीतील हत्येचा मास्टरमाइंड अखेर अटक; CCTV फुटेज समोर आल्यानंतर मोठी कारवाई

या फुटेजमध्ये मारेकरी फार्मसिस्ट उमेश कोल्हे यांचा बाईकवरुन पाठलाग करीत असल्याचं दिसून येत आहे.

    अमरावती, 2 जुलै : उदयपूरमधील टेलर कन्हैयालालची हत्या होण्याच्या बरोबर एक आठवडापूर्वी अमरावतीमधील (Amravati Crime News) उमेश कोल्हे या 54 वर्षांच्या केमिस्टची हत्या करण्यात आली होती. कोल्हे यांनी भाजपामधील निलंबित नेत्या नुपूर शर्मा (Nupur Sharma) यांच्या बाजूनं पोस्ट लिहिली होती. याच कारणांमुळे कोल्हे यांची हत्या झाल्याचा संशय तपास अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. दरम्यान या प्रकरणात आता सीसीटीव्ही फुटेजदेखील समोर आलं आहे. ही हत्या करणाऱ्या मारेकऱ्यांचं एक सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या हाती आले आहे. या फुटेजमध्ये मारेकरी फार्मसिस्ट उमेश कोल्हे यांचा बाईकवरुन पाठलाग करीत असल्याचं दिसून येत आहे. उमेश कोल्हे यांनी काही दिवसांपूर्वी एक फॉरवर्डेड मेसेज व्हॉट्सअॅपवर निवडक ग्रुपमध्ये शेअर केला होता. या मेसेजला उत्तर म्हणून उमेश कोल्हे यांची सहा जणांनी मिळून सुऱ्याने गळा चिरून हत्या केली. उमेश कोल्हे हत्या प्रकरणात मुख्य सूत्रधार ताब्यात उमेश कोल्हे यांच्या हत्येचा मुख्यसूत्रधाराला अखेर अमरावती पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. शेख इरफान शेख रहीम (वय ३५ रा.पठाण चौक अमरावती) असं अटक केलेल्या आरोपीचं नाव आहे. नागपूर येथून मुख्य सूत्रधाराला पोलिसांनी अटक केली आहे. आतापर्यंत पोलिसांनी या प्रकरणात सात आरोपींना अटक केली आहे. काय आहे प्रकरण? कोल्हे 21 जून रोजी रात्री 10 ते 10.30 दरम्यान त्यांचे 'मेडिकल स्टोर' बंद करून घरी जात असताना हा प्रकार घडला. त्यावेळी संकेत त्याची पत्नी वैष्णवीसोबत दुसऱ्या बाईकवर होता. संकेतनं दिलेल्या तक्रारीनुसार 'मोटारसायकलीवरून आलेल्या दोन जणांनी अचानक माझ्या वडिलांची बाईक अडवली आणि त्यांनी वडिलांची गळ्यावर चाकूनं हल्ला केला. त्यावेळी त्यांच्या गळ्यातून बरंच रक्त वाहात होते. मी माझी गाडी थांबवली आणि मदतीसाठी लोकांना ओरडून विनंती केली. त्यावेळी अन्य एक जण आला आणि त्यासोबत दोन्ही मारेकरी मोटारसायकलीवरून फरार झाले. मी आजूबाजूच्या लोकांच्या मदतीनं वडिलांना हॉस्पिटलमध्ये नेले. हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. अमरावती शहर पोलिसांमधील एका वरिष्ठ अधिकाऱ्यानं दिलेल्या माहितीनुसार 'अटक करण्यात आलेल्या पाच आरोपींनी दिलेल्या कबुलीनुसार त्या सर्वांना आणखी एका आरोपीनं मदत केली होती. त्यानं या आरोपींना पळून जाण्यासाठी एक कार आणि 10,000 रूपये दिले होते.'
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: Amravati, BJP, Crime news, Gang murder, Murder

    पुढील बातम्या