लखनऊ 04 जून : उत्तर प्रदेशातील हापूर येथे एका कुत्र्याचा रस्ता अपघातात मृत्यू झाल्यानंतर त्याच्या मालकाने पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल केली आहे. ही घटना हाफिजपूर पोलीस स्टेशन हद्दीतील आहे. उबरपूर येथे एका पाळीव कुत्र्याचा रस्ते अपघातात मृत्यू झाल्यानंतर (Dog Died in Road Accident) त्याच्या मालकाने पोलीस स्टेशन गाठलं. पोलिसांनी अज्ञात वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. पोलिसांनी कुत्र्याचं पोस्टमॉर्टमही केलं आहे. कुत्र्याचा मृत्यू झाल्याची पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदविण्याचा विषय परिसरात चर्चेचा विषय ठरला आहे. उबरपूरचा रहिवासी असलेल्या अंकितने बऱ्याच काळापासून एक कुत्रा पाळला होता. तो शेतातून परतल्यावर कुत्रा त्याला पाहून बाहेर आला. याचदरम्यान, एका मिनी ट्रकने कुत्र्याला चिरडल्याने कुत्र्याचा मृत्यू झाला. भंडारा हादरलं! प्रेम प्रकरणातून हत्याकांड, हॉटेलमध्ये जेवले मग बाहेर येऊन तरुणाला संपवले, हत्येचा खळबळजनक VIDEO आला समोर कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार, गेल्या दोन वर्षांपासून तो त्या कुत्र्याला पाळत होता. याबाबत अंकितने पोलिसांत तक्रार केली. माहिती मिळताच पोलीसही घटनास्थळी पोहोचले. त्यानंतर कुत्र्याच्या मालकाने ट्रकचालकाविरुद्ध पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. गुन्हा दाखल करून पोलिसांनी कुत्र्याला शवविच्छेदनासाठी पाठवले. मात्र आता आरोपींना शिक्षा होण्यासाठी आणि न्यायासाठी लढा देणार असल्याचं कुटुंबीयांचं म्हणणं आहे. आता ही बाब संपूर्ण परिसरात चर्चेचा विषय ठरली आहे. डॉक्टरांच्या पॅनलने कुत्र्याचं पोस्टमॉर्टमही केलं आहे. Dhule Crime : पत्नीचे चुलत सासऱ्यासोबत अनैतिक संबंध, पतीला कळल्यावर त्याने उचललं टोकाचं पाऊल या प्रकरणाबाबत हाफिजपूर पोलीस स्टेशनचे प्रभारी महेंद्र सिंह यांनी सांगितलं की, एका मिनी ट्रकने कुत्र्याला धडक दिली. यानंतर मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चौकशीनंतर पुढील कारवाई केली जाईल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.