नेहाल भुरे, प्रतिनिधी भंडारा, 4 जून : प्रेम प्रकरणातून धारदार शस्त्राने हल्ला करुन एका तरुणाची हत्या (youth brutally killed over love affair) करण्यात आली आहे. ही घटना घटना भंडारा जिल्ह्याच्या तुमसर (Tumsar Bhandara) येथील देव्हाडी मार्गावरील हॉटेल प्रसाद समोर घडली आहे. हत्येचा हा थरार हॉटेलबाहेर लावण्यात आलेल्या सीसीटीव्हीत कैद (murder caught in cctv) झाला आहे. सचिन गजानन मस्के (34) रा. शिवाजी नगर तुमसर असे मृताचे नाव आहे. तीन आरोपींनी मिळून ही हत्या केली असून सर्व तिन्ही आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. कुलदीप मनोहर लोखंडे वय 27 वर्ष, चेतन दिलीप मदारकर वय 28 वर्ष तर रंजीत सहादेव गभने वय 32 वर्ष या तिन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे. हे तिन्ही आरोपी तुमसर येथील शिवाजी नगर येथील निवासी आहेत. या प्रकरणात तुमसर पोलीस पुढील तपास करीत आहेत. तुमसर शहरातील देव्हाडी मार्गावरील हॉटेल प्रसादमध्ये सचिनसह तीन ते चार जण जेवण करण्यासाठी शुक्रवारी सायंकाळी गेले होते. जेवन आटोपून हॉटेलच्या बाहेर आले तेव्हा त्यांच्या जूना प्रेम प्रकरणाचा कारणावरुन वाद उघडून आला. दरम्यान सचिन आपल्या दोन मित्रांसोबत दुचाकीने निघाला. वाचा : एकतर्फी प्रेमातून अल्पवयीन मुलीला गावगुंडाने पाजले विष; बीडमधील धक्कादायक घटना त्यावेळी त्याची गाड़ी थांबवत आरोपी रंजीत गभने याने सचिनच्या पाठीवर आणि पोटावर तिक्ष्ण हत्याराने सपासप वार केले. त्यात तो जागीच ठार झाला. सचिन मृत्युमुखी पडल्याची खातरजमा होताच सर्व आरोपींनी तिथून पळ काढला. या घटनेचा थरार हॉटेलच्या सीसीटीव्हीत कैद झाला. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. दरम्यान तुमसर पोलिसांनी तिन्ही आरोपींला अटक केली आहे. विशेष म्हणजे सचिनला प्रेम प्रकरणामुळे सचिनला संपविण्याचा कट आरोपींनी सुरुवातीला आखल्याची माहिती समोर येत आहे. वर्ध्यात तरुणाला दगडाने ठेचलं आणि चाकूने कापला गळा वडिलांशी वाद का घातला, याचा जाब विचारण्यास गेलेल्या अवघ्या 27 वर्षीय युवकाला दगडाने ठेचून मानेवर धारदार शस्त्राने वार करत हत्या करण्यात आल्याची घटना धक्कादायक घटना वर्धा शहरातील स्टेशनफैल परिसरात मंगळवारी रात्री घडली. या घटनेने स्टेशनफैल परिसरात खळबळ माजली. पोलिसांनी आरोपी बाप लेकासह त्याच्या मावस भावाला रात्रीच बेड्या ठोकल्या. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आशिष आनंद रणधीर (27, रा. स्टेशनफैल) असे मृतक युवकाचे नाव आहे. तर पोलिसांनी याप्रकरणात शुभम जयस्वाल (27), वडील लक्ष्मीनारायण जयस्वाल (64) आणि आदित्य जयस्वाल यांना अटक केली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.