मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /मामाच्या पोरीवर आला जीव, पण लग्नाला नकार दिल्यावर प्रेमात वेड्या तरुणाने उचललं भयानक पाऊल

मामाच्या पोरीवर आला जीव, पण लग्नाला नकार दिल्यावर प्रेमात वेड्या तरुणाने उचललं भयानक पाऊल

आरोपी तरुणाचे वय 19 इतके आहे.

आरोपी तरुणाचे वय 19 इतके आहे.

आरोपी तरुणाचे वय 19 इतके आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Nanded, India

नांदेड, 16 सप्टेंबर : एकतर्फी प्रेमात व्यक्ती काय करेल याचा नेम नसतो. याचसंबंधित एक धक्कादायक घटना समोर आली आहे. नांदेड येथे एका तरुणाने आपल्या मामाची कुऱ्हाडीने वार करत हत्या केली. प्रेमप्रकरणातून ही हत्या करण्यात आली आहे. आरोपी तरुण हा आपल्या मामाच्या मुलीवर एकतर्फी प्रेम करत होता. तसेच तिच्यासोबत त्याला लग्न करायचे होते. मात्र, त्याच्या मामाने या लग्नाला नकार दिला होता. अनेक प्रयत्न केल्यावरही मामा लग्नाला तयार न झाल्याने अखेर आरोपी तरुणाने आपल्या मामाची हत्या केली.

काय आहे संपूर्ण प्रकरण -

दरम्यान, या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. यानंतर पोलिसांनी आरोपी तरुणाला अटक केली आहे. तसेच त्याच्याकडून हत्येसाठी वापरण्यात आलेली कुऱ्हाडही जप्त करण्यात आली आहे. पोलीस याप्रकरणाचा कसुन तपास करत आहे.

नांदेड जिल्हा पोलीस अधीक्षक प्रमोद कुमार शेवाळे यांनी सांगितले की, आरोपी तरुणाचे वय 19 इतके आहे. त्याला अटक करण्यात आली आहे. एकनाथ बंधु जादव, असे त्याचे नाव आहे. अर्द्धापुर तालुक्याच्या छाबरा गावात ही घटना घडली. याप्रकरणी मनाठा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आरोपीला त्याचे मामा बालाजी काकडे यांच्या मुलीशी लग्न करायचे होते. त्याने यासाठी अनेकदा त्यांच्यासोबत याबाबत चर्चाही केली. मात्र, मामाने त्याला ण्याचा प्रयत्न करत होता. पण मामाने या लग्नाला साफ नकार दिला. मात्र, एकतर्फी प्रेमात आंधळा झालेल्या या तरुणाने कोणत्याही परिस्थितीत आपल्या मामाला आपल्या रस्त्यातून हटवण्याचा निर्णय घेतला आणि त्याची हत्या केली. ही घटना 9 सप्टेंबरला घडली.

9 सप्टेंबरला रात्री बालाजी काकडे हे आपल्या घराच्या बाहेर झोपले होते. याचवेळी आरोपी कुऱ्हाडी घेऊन आला आणि त्याने क्रूरतेने त्याच्या मामावर वार केले. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांच्या परिवारातील लोक झोपेतून उठल्यार बाहेर आले तेव्हा ही घटना समोर आली. यानंतर पोलिसांना या घटनेची माहिती देण्यात आली.

हेही वाचा - मामी अन् भाच्याचं जुळलं सूत, अनं नंतर मामासोबत घडलं भयानक कांड; वाचा सविस्तर

घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. तपासादरम्यान, पहिला संशय आरोपी एकनाथवर आला. अशा स्थितीत पोलिसांनी प्रथम त्याच्यावर नजर ठेवण्यास सुरुवात केली. त्याची अनेकदा चौकशी करण्यात आली. मात्र, तो वारंवार आपला जबाब बदलत राहिला. यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन त्याची कसून चौकशी केली असता त्याने घटनेची कबुली दिली. यानंतर पोलिसांनी त्याच्या सांगण्यावरून गुन्ह्यात वापरलेली कुऱ्हाड जप्त केली. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.

First published:
top videos

    Tags: Crime news, Love at first sight, Murder, Nanded