मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /

मामी अन् भाच्याचं जुळलं सूत, अनं नंतर मामासोबत घडलं भयानक कांड; वाचा सविस्तर

मामी अन् भाच्याचं जुळलं सूत, अनं नंतर मामासोबत घडलं भयानक कांड; वाचा सविस्तर

महिलेच्या पतीने सांगितले की, त्याचे लग्न 10 वर्षांपूर्वी नेशल येथील एका महिलेसोबत झाले होते.

महिलेच्या पतीने सांगितले की, त्याचे लग्न 10 वर्षांपूर्वी नेशल येथील एका महिलेसोबत झाले होते.

महिलेच्या पतीने सांगितले की, त्याचे लग्न 10 वर्षांपूर्वी नेशल येथील एका महिलेसोबत झाले होते.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Rajasthan, India
  • Published by:  News18 Desk

चूरू, 16 सप्टेंबर : प्रेम आंधळे असते, ते कधीही होऊ शकते, असे म्हटले जाते. त्यामुळे अनैतिक प्रेमसंबंधातून हत्येच्या, खूनाच्या अनेक धक्कादायक घटना समोर येत असतात. तसेच अनेक जण आपल्या जोडीदाराची फसवणूकही केल्याचे अनेक प्रकार समोर आले आहेत. अशीच एक घटना समोर आली आहे.

एक अल्पवयीन मुलगा आणि त्याची 35 वर्षाची मामीमध्ये प्रेमसबंध जुळले. याबाबत महिलेच्या पतीला माहिती झाल्यावर त्याला धक्काच बसला आणि त्याने थेट पोलीस ठाण्यात धाव घेत याप्रकरणी तक्रार दिली. ही घटना राजस्थानच्या चुरू जिल्ह्यातील बीनासर येथील आहे.

महिलेच्या पतीने सांगितले की, त्याचे लग्न 10 वर्षांपूर्वी नेशल येथील एका महिलेसोबत झाले होते. त्यांना दोन मुलेही आहेत. त्याने सांगितले की, कारंगो बड़ा येथील रहिवासी असलेल्या त्याचा अल्पवयीन भाचा त्याच्या घरी येत जात होता. यादरम्यान दोघांमधील जवळीक वाढली आणि त्याचे रुपांतर प्रेमात झाले. दोघांचे प्रेम-संबंध इतके घट्ट झाले की त्यांनी सर्व नाते सोडून एकत्र राहण्याचा निर्णय घेतला.

पती-पत्नीमध्ये घटस्फोट नाही

महिलेच्या पतीने सांगितले की, काही दिवसांपूर्वी पत्नीने भाच्यासोबत लग्न केल्याचे सांगितले होते. आता ती त्याच्यासोबत घर बसवणार आहे. मात्र, महिलेचा पती आणि आणि तिच्यामध्ये आतापर्यंत दोघांमध्ये घटस्फोट झालेला नाही.  याप्रकरणी सदर पोलीस ठाणे देखील दाखल करण्यात आले आहे. हे लग्न कायदेशीररित्या योग्य नाही, असेही महिलेच्या पतीने सांगितले.

कुटुंबीयांनी महिला आणि अल्पवयीन मुलाने लग्न न करण्याबाबत दोघांना खूप समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र, दोघेही लग्न करण्यावर ठाम राहिले. दोघेही एकत्र जगणार आणि मरणार असल्याचे महिलेने स्पष्ट केले. तसेच महिलेने पहिल्या पतीसोबत जाण्यास नकार दिला.

हेही वाचा - 35 वर्षीय महिलेनं रात्रभर 19 वर्षीय प्रियकरासोबत पार्टी केली; पहाटे घराबाहेर दिसलं भयानक दृश्य

कायदेशीरदृष्ट्या लग्न वैध नाही -

या नात्यात सामाजिक हानी आहेत. मात्र, मामी आणि भाच्याच्या वयातही मोठे अंतर आहे. विवाहित पूनम 35 वर्षांची आहे, तर तिचा भाचा केवळ 17 वर्षांचा आहे. त्यामुळे हे लग्न वैध नाही. मात्र, या संपूर्ण प्रकारामुळे एकच खळबळ उडाली आहे.

First published:

Tags: Crime news, Rajasthan, Women extramarital affair