पाटना, 11 जून : बिहारच्या (Bihar News) शेखपुरामध्ये (sheikhpura) एका तरुणीने आपल्या प्रेमासाठी सर्व मर्यादा तोडल्या. प्रियकरासाठी ती पतीला सोडून निघून गेली. यानंतर तिने आपल्या प्रियकरासोबत कोर्टात जाऊन लग्न केलं. मात्र दोघांंचं लग्न फार दिवस चालू शकलं नाही. लग्नाच्या काही महिन्यात तरुणाने पत्नीची (Killed Wife) हत्या केली. हत्येनंतर आरोपी फरार आहे. पोलीस या प्रकरणात तपास करीत आहे. वैशाली(Vaishali) जिल्ह्यात राहणारी काजल ही गावातील राजेश नावाच्या तरुणावर खूप प्रेम करीत होती. दोघे एकाच गावातील होते, मात्र वेगवेगळ्या जातीचे. त्यामुळे दोन्ही कुटुंबाला हे नातं मंजूर नव्हतं. यादरम्यान काजलच्या वडिलांनी तिचं लग्न दुसऱ्या ठिकाणी लावून दिलं, मात्र काजलला हे लग्न पसंत नव्हतं. मात्र तरीही मनाविरोधात तिचं लग्न लावून देण्यात आलं. मात्र लग्नानंतरही ती प्रियकराला विसरू शकली नव्हती. ती त्याच्या संपर्कात होती. काजल आणि राजेश एकमेकांशी बोलत होते. एकेदिवशी संधी साधून काजल आपल्या पतीच्या घरातून फरार झाली. दोघांनी 4 मे 2022 रोजी कोर्टात लग्न केलं. लग्नानंतर तो पत्नीला घरी घेऊन गेला. मात्र त्याआधी काही दिवस ते घरापासून दूर राहत होते. मात्र घरी आल्यानंतर कुटुंबातील सदस्य नाराज झाले. त्यांनी तिला घरी ठेवण्यात नकार दिला. मात्र काही दिवसांनंतर त्यांनी हे नातं मान्य केलं. मुलगी आल्यानंतर तिचे वडीलही भेटायला गेल्याचं सांगितलं जात आहे. यानंतर पंचायतही बसवण्यात आली. मात्र काही दिवसात काजलची हत्या करण्यात आली. पतीनेच ही हत्या केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. पोलीस या प्रकरणात तपास करीत आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.