Home /News /crime /

आईची हत्या केल्यानंतर क्रिकेट मॅच, घरात मित्रांसोबत सिनेमा अन् जेवण; 5 व्या दिवशी कुजलेल्या मृतदेहामुळे सत्य उघड

आईची हत्या केल्यानंतर क्रिकेट मॅच, घरात मित्रांसोबत सिनेमा अन् जेवण; 5 व्या दिवशी कुजलेल्या मृतदेहामुळे सत्य उघड

पाच दिवस आईचा मृतदेह एका खोलीत पडून होता. पाचव्या दिवशी घरभर दुर्गंधी पसरली होती. मात्र 16 वर्षांच्या मुलाला काही पर्वाच नव्हती.

    लखनऊ, 9 जून : PUBG गेम खेळण्यावरुन आईची हत्या (Killed Mother) केल्या प्रकरणात वारंवार नवनव्या गोष्टी समोर येत आहेत. धक्कादायक बाब म्हणजे आईची हत्या केल्यानंतर अल्पवयीन आरोपी मित्रांसोबत मॅच खेळायला निघून गेला. इतकच नाही तर मित्रांना घरी बोलावून सिनेमाही पाहिला. हत्येनंतर मित्रांसोबत पार्टी केली... सकाळी 8 वाजता त्याने बहिणीला खोलीत बंद केलं, आणि आईची स्कूटी घेऊन मॅच खेळायला गेला. दुपारी 3 वाजता मॅच खेळून घरी परतला. सायंकाळी 5 वाजता एका मित्राला फोन करून बोलावलं. बहिणीला दुसऱ्या खोलीत बंद करून मित्रासोबत पार्टी केली. रात्रभर दोघांनी सिनेमा पाहिला. मित्राने आईबद्दल विचारलं तर आरोपीने आजीकडे गेल्याचं सांगितलं. लखनऊमध्ये आईची गोळी मारून हत्या करणाऱ्या 16 वर्षीय मुलाच्या कृत्याबाबत त्याच्या वडिलांना आधीच संशय आला होता. ते सैन्यात अधिकारी आहेत. गेल्या 5 दिवसात त्यांनी पत्नीला तब्बल 2000 वेळा कॉल केला होता. 3 जून रोजी त्यांचं शेवटचं बोलणं झालं होतं. यानंतर पत्नीने कॉल उचलला नसल्यामुळे ते अस्वस्थ झाले होते. पत्नीचं काही बरं वाईट झाल्याचा त्यांचा संशय खरा ठरला. काही वेळानंतर मुलाने त्यांना फोन करून आईची हत्या झाल्याचं सांगितलं गच्चीवरुन येत आईची हत्या... 7 जूनपर्यंत आईचा मृतदेह लपवणं अवघड झालं होतं. वडिलांचा सकाळपासून फोन आणि व्हॉट्सअॅप मेसेज येत होता. दुपारी त्याने कॉल  उचलला. सायंकाळपर्यंत घरात दुर्गंधी पसरली होती. आता हे कृत्य लपवण अवघड असल्याचं त्याच्या लक्षात आलं. यानंतर सायंकाळी  7 वाजता त्याने स्वत: वडिलांना फोन करून कोणीतरी आईची हत्या केल्याचं सांगितलं. भुकेल्या बहिणीला शेजारच्यांकडे मागून दिलं अन्न... सोमवारी सकाळी त्याचा मित्र निघून गेला. दुपारी साधारण 12 वाजता बहिणीला भूक लागल्याचं ती म्हणाली. यानंतर तो शेजारच्यांकडे गेला. आई आजीकडे गेल्याचं सांगून त्याच्याकडून बहिणीसाठी खायला घेतलं. सायंकाळी 5 वाजता दुसऱ्या मित्राला बोलावलं. यावेळी मित्रासोबत घरात स्वयंपाक केला. तोपर्यंत घरात असलेला आईचा मृतदेह कुजू लागला होता. दुर्गंधीही येऊ लागली होती. यावर आरोपीने मित्राला सांगितलं की, शेजारी एक प्राणी मरून पडला आहे. वडिलांना आधीच होता मुलावर संशय.. महिलेचा पती नवीन कुमार सिंह पश्चिम बंगालमधील आसनसोलमध्ये 21 राजपुताना बटालियनमध्ये पोस्टेड आहे. ते म्हणाले की, शुक्रवारी साधारण 8 वाजता मी पत्नी साधनाला फोन केला. ते पत्नीसोबत शेवटचं बोलणं होतं. यानंतर त्याने सायंकाळी फोन केला, मात्र तिने फोन उचलला नाही. सातत्याने 50 कॉल केल्यानंतरही काहीच उत्तर आलं नाही. मुलाने काहीतरी केल्याचा संशय त्यांना आला होताच. आईची हत्या करून मॅच खेळायला गेला मुलगा.. रविवारी सकाळी 8 वाजले होते. मी फोन केला तर मुलाने फोन उचलला. आई कुठे गेल्याचं विचारताच बाहेर सामान आणायला गेल्याचं तो म्हणाला. त्यांनी लहान मुलीला विचारलं तर तिनेही हेच सांगितलं. मात्र तिचा आवाज वेगळाच येत होता. यावेळी वडिलांना संशय़ आला. यानंतर त्यांनी शेजारच्यांना फोन केला. त्यांना घरी पाठवल. मात्र शेजारच्यांनी सांगितलं की, घरात कोणीच नाही. मुलगा क्रिकेट किट घेऊन स्कूटीवरुन जात आहे. यानंतर त्यांचा संशय वाढला. कारण साधना मुलाला कधीच स्कूटी देत नव्हती. मुलाने अशी केली आईची हत्या... सकाळी साधना विजेचं बिल भरून घरी परतली. त्यावेळी मुलगा फोनवर गेम खेळत होता. रागाच्या भरात आईने मुलाकडून फोन खेचून घेतला आणि केस पकडून त्याला मारू लागली. सायंकाळी घरातून 10 हजार रुपये गायब झाले होते. मुलावर संशय झाल्यानंतर त्यांनी त्याला पुन्हा मारलं. रात्री साधारण 10 वाजता एकाच बेडवर मध्ये साधना आणि दोन्ही बाजूला 16 वर्षांचा मुलगा आणि 10 वर्षांची मुलगी झोपले होते. रात्री 2 वाजता मुलगा उठला. आई आणि बहीण गाठ झोपेत होत्या. त्याने कपाटातून बंदूक काढली. मॅगजीन लोड केलं आणि आईच्या डोक्यावर गोळी झाडली. गोळीचा आवाज ऐकून बहीण जागी झाली. यावर तो म्हणाला दुसरीकडे बघ आईचा मृत्यू झाला आहे. यानंतर तो बहिणीला दुसऱ्या खोलीत घेऊन गेला. रात्रभर बहीण रडत राहिली आणि तो तिला धमकावत होता.
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: Crime news, Mother killed, Online, Pubg game, Uttar pradesh

    पुढील बातम्या