जाहिरात
मराठी बातम्या / क्राईम / हातावर मेहंदी आणि मंडपात सजून-धजून बसलेली नवरी थेट पोलीस ठाण्यात पोहोचली; नेमकं काय घडलं?

हातावर मेहंदी आणि मंडपात सजून-धजून बसलेली नवरी थेट पोलीस ठाण्यात पोहोचली; नेमकं काय घडलं?

हातावर मेहंदी आणि मंडपात सजून-धजून बसलेली नवरी थेट पोलीस ठाण्यात पोहोचली; नेमकं काय घडलं?

विवाह सोहळ्याचं वादात रूपांतर झालं. याचा परिणाम म्हणजे ज्या नवरीला आपल्या सासरी जायचं होतं, ती मंडपातून थेट पोलीस ठाण्यात पोहोचली.

  • -MIN READ
  • Last Updated :

वी दिल्ली 10 जून : एका नवरीने लग्नाची स्वप्नं सजवली होती, मात्र लग्नाच्या दिवशीच आपल्याला मंडपात नाही तर पोलीस ठाण्यात बसावं लागेल, याची कल्पनाही तिला नव्हती. प्रकरण कुशीनगरचं आहे, जिथे हुंड्यामुळे फक्त लग्नच मोडलं नाही, तर संपूर्ण कुटुंबासह वधूला पोलीस ठाण्यात बसून धरणे आंदोलन करावं लागलं. नवरीच्या हातावरील मेहंदीचा रंग रंगला, पण तिचं आयुष्य बेरंग झालं. कारण होतं हुंड्याची मागणी, ज्याने नवरीचं नवं आयुष्य सुरू होण्यापूर्वीच उद्धवस्त केलं (Weird Incident in Wedding). VIDEO: लग्नानंतर पहिल्याच दिवशी नवरीला उचलून जमिनीवर आपटलं; नवरदेवाचं कृत्य पाहून सगळेच हैराण प्रकरण जनपदच्या बैरिया येथील आहे, ज्यात वराच्या बाजूने अचानक हुंड्याची मागणी (Dowry in Wedding) झाल्याने विवाह सोहळ्याचं वादात रूपांतर झालं. याचा परिणाम म्हणजे ज्या नवरीला आपल्या सासरी जायचं होतं, ती मंडपातून थेट पोलीस ठाण्यात पोहोचली. हे प्रकरण कसया पोलीस ठाण्याच्या बैरिया भागातील आहे. जिथे बरवा जंगलातून वरात बलजीत सिंगच्या घरी आली होती. सुरुवातीला सर्व काही ठीक होतं. मात्र वरमाळेनंतर लग्नाचे दुसरे विधी सुरू होताच मुलाच्या बाजूचे लोक हुंड्याच्या मागणीवर उतरले. याआधीही वीस लाख रुपये हुंडा म्हणून दिले होते, मात्र नंतर आणखी दहा लाखांची मागणी करण्यात आल्याचा आरोप पीडितेने केला आहे. रात्री सात फेरे घेतले आणि सकाळीच तोडलं नवरदेवासोबतचं नातं; कारण जाणून व्हाल थक्क या प्रकरणी नवरदेवाच्या पक्षासोबत बोलण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी कॅमेऱ्यासमोर काहीही बोलण्यास नकार दिला. त्याचबरोबर पोलीसही याप्रकरणी काहीही बोलायला तयार नाहीत. मात्र, याप्रकरणी दोन्ही बाजूंमध्ये तोडगा निघणार असल्याचं पोलीस अधिकारी ऑफ कॅमेरा बोलत आहेत. झी न्यूजने याबाबतचं वृत्त दिलं आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bride , wedding
  • First Published :
जाहिरात
जाहिरात