मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /

आईच्या मृतदेहाशेजारी 2 दिवस उपाशी पडून होतं तान्ह बाळ, खाकी वर्दीतील आईपणाला फुटला मायेचा पाझर

आईच्या मृतदेहाशेजारी 2 दिवस उपाशी पडून होतं तान्ह बाळ, खाकी वर्दीतील आईपणाला फुटला मायेचा पाझर

पुण्यातील पिंपरी भागात एक हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली आहे. येथील एका महिलेचा मृत्यू (Mother death) झाल्यानंतर बंद घरात दीड वर्षाच्या बाळाला 2 दिवस उपाशी राहावं (1.5 year old Baby starved for 2 days) लागलं आहे.

  • Published by:  News18 Desk

पिंपरी, 28 एप्रिल: पुण्यातील पिंपरी भागात एक हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली आहे. येथील एका महिलेचा मृत्यू (Mother death) झाल्यानंतर बंद घरात दीड वर्षाच्या बाळाला 2 दिवस उपाशी राहावं (1.5 year old Baby starved for 2 days) लागलं आहे. घटनेच्या दोन दिवसानंतर घरातून दुर्गंध येत असल्यानं घरमालकानं याची माहिती पोलिसांना दिली. यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन घरात प्रवेश केला असता त्यांनाही धक्का बसला आहे. याठिकाणी दीड वर्षाच बाळ आपल्या मृत आईशेजारी दोन दिवस उपाशीपोटी निपचित पडून राहिलं होतं. भुकेनं व्याकुळ झालेल्या या बाळाला कोरोनाच्या भीतीनं कुणीही घास भरवण्यासाठी पुढं सरसावलं नाही. पण खाकी वर्दीतील आईपणाला मायेचा पाझर फुटला आहे.

संबंधित घटना दिघीतील मॅगझीन चौकाकडून भोसरीकडे जाणाऱ्या रस्त्यावरील फुगेवस्तीत सोमवारी उघडकीस आली आहे. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली होती. सरस्वती राजेश कुमार असं 29 वर्षीय मृत महिलेचं नाव असून ती मुळची उत्तरप्रदेशातील कानपूर येथील रहिवासी आहे. मृत महिला आपल्या दीड वर्षांचा मुलगा आणि पतिसोबत फुगेवस्तीत भाडेतत्त्वावर राहत होती. मृत महिलेचा पति राजेश कुमार आपल्या मुळ गावी उत्तर प्रदेशात गेला होता, तेव्हा असा प्रसंग घडला आहे.

हे वाचा-डॉक्टरांनीही सोडली होती आशा; 13 दिवसांतच कोरोनाग्रस्त आजीने मृत्यूलाही दिला चकवा

दैनिक लोकमतने दिलेल्या वृत्तानुसार, मृत महिला आणि तिचा पती राजेश कुमार हे आपल्या दीड वर्षांच्या बाळाला घेऊन दोन महिन्यांपूर्वी फुगेवस्ती येथे राहायला आले होते. दरम्यान मृत महिलेचा पती राजेश कुमार आपल्या मुळगावी गेला होता. तो गावी गेल्यानंतर संबंधित महिलेचा मृत्यू झाला. यावेळी घरात इतर कोणीही नसल्यानं दीड वर्षाचं बाळ दोन दिवस आपल्या आईच्या मृतदेहाशेजारीच पडून राहिलं आहे. पण घटनेच्या दोन दिवसानंतर घरातून दुर्गंध येऊ लागल्यानं ही घटना उघड झाली आहे.

हे वाचा-कडक सॅल्युट..! आत्महत्या करायला निघालेल्या तरुणीचे मुंबई पोलिसांनी वाचवले प्राण

याप्रकरणी माहिती मिळताचं पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन दीड वर्षाच्या बाळाला आपल्या ताब्यात घेतलं आहे. तसेच भुकेनं व्याकुळ झालेल्या बाळाला मायेनं घासही भरवला आहे. तर दुसरीकडे मृत महिलेचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला असून पती राजेश कुमार यांना घटनेची माहिती दिली आहे. संबंधित महिलेच्या मृत्यूचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालं नसून शवविच्छेदनानंतर याची अधिकृत पुष्टी होईल, असं पोलिसांकडून सांगण्यात आलं आहे.

First published:

Tags: Death, Pune