मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

कडक सॅल्युट..! आत्महत्या करण्यासाठी निघालेल्या तरुणीचे मुंबई पोलिसांनी वाचवले प्राण

कडक सॅल्युट..! आत्महत्या करण्यासाठी निघालेल्या तरुणीचे मुंबई पोलिसांनी वाचवले प्राण

कुटुंबामध्ये काही तरी वाद झाल्याने 19 वर्षांची ही तरुणी तिच्या घराच्या छतावर चढली. रागाच्या भरामध्ये तिनं आयुष्य संपवण्याचा निर्णय घेतला होता. इमारतीवरून उडी मारत जीवन संपवण्याचा निर्णय तिनं घेतला. पण थोडक्यात हा अनर्थ टळला.

  • Published by:  News18 Desk

मुंबई, 27 एप्रिल: आपल्या समाजामध्ये स्थैर्य कायम ठेवण्यासाठी पोलीस नेहमीच झटत असतात. अगदी सामाजिक वादांपासून ते गुन्हे, दंगली अशा परिस्थितीतही समाजात शांतता ठेवण्याचं काम पोलीस (Mumbai police) 24 x 7 करत असतात. पण एवढंच नाही तर कौटुंबीक वादांमध्येही अत्यंत योग्य पद्धतीने परिस्थिती हाताळून वाद मिटवण्याचा प्रयत्नही ते करत असतात. मुंबई पोलिसांनी नुकत्यात केलेल्या अशा एका कारवाईचं कौतुक होत आहे.

मुंबईच्या ताडदेव परिसरात ही घटना घडल्याची माहिती मिळाली आहे. कुटुंबामध्ये झालेल्या एका किरकोळ वादातून एक तरुणी आत्महत्या करायला निघाली होती. मात्र पोलिसांनी तातडीनं याठिकाणी पोहोचत तिची समजूत काढली आणि तिचा विचार बदलला. कुटुंबामध्ये काही तरी वाद झाल्याने 19 वर्षांची ही तरुणी तिच्या घराच्या छतावर चढली. रागाच्या भरामध्ये तिनं आयुष्य संपवण्याचा निर्णय घेतला होता. इमारतीवरून उडी मारत जीवन संपवण्याचा निर्णय तिनं घेतला. पण थोडक्यात हा अनर्थ टळला. मुंबई पोलिसांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून या घटनेबाबत माहिती दिली.

(हे वाचा-कडक लॉकडाऊनमध्ये शेगावात लॉजवर सुरू होती देहविक्री, कोलकात्याच्या तरुणीला अटक)

ताडदेव पोलिसांना या घटनेबाबत माहिती मिळाली होती. त्यामुळं तातडीनं ताडदेव पोलिस स्टेशनचं पथक संबंधित ठिकाणी पोहोचलं. पोलिसांनी तरुणीची समजूत काढत सर्वात आधी तिला शांत करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर तरुणीला शांत केल्यानंतर आत्महत्येच्या निर्णयापासून तिचं मन वळवलं आणि तिला खाली उतरवण्यात आलं. त्यानंतर पोलिसांनी तिची समजूत काढली आणि तिचं समुपदेशनही केलं. ही तरुणी आता सुरक्षित असून कुटुंबाबरोबर असल्याचं पोलिसांनी म्हटलं आहे.

(हे वाचा-प्रेमसंबंधात अडसर ठरणाऱ्या भावाची हत्या केल्याचा आरोप, प्रसिद्ध अभिनेत्रीला अटक)

कायदा आणि सुव्यवस्था राखण्याच्या आव्हानबरोबरच पोलिसांवर इतरही मोठ्या प्रमाणावर ताण आहे. त्यात सध्याच्या कोरोनाच्या संकटात तर पोलिस अधिकच तणावात आहेत. मात्र तरीही अगदी जिथं गरज असेल त्याठिकाणी पोलिस हजर होतात आणि कौटुंबीक असो वा दुसरे वाद ते सोडवण्याचा प्रयत्न करतात. नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी कायम सर्वस्प अर्पण करणाऱ्या पोलिसांच्या या कार्याला सलाम करायलाच हवा.

First published:

Tags: Crime, Crime news, Maharashtra, Mumbai police, Suicide