• Home
 • »
 • News
 • »
 • lifestyle
 • »
 • डॉक्टरांनीही सोडली होती आशा, पण डायबेटिक आजीने मृत्यूलाही दिला चकवा; 13 दिवसांतच कोरोनातून ठणठणीत बऱ्या झाल्या

डॉक्टरांनीही सोडली होती आशा, पण डायबेटिक आजीने मृत्यूलाही दिला चकवा; 13 दिवसांतच कोरोनातून ठणठणीत बऱ्या झाल्या

डॉक्टरांनी या कोरोनाग्रस्त आजी 24 तासांपेक्षा जास्त वेळ जगणार नाहीत, असं सांगितलं होतं.

 • Share this:
  मुंबई, 28 एप्रिल : देशातील कोरोनाची (Coronavirus) परिस्थिती भयानक आहे. कित्येक लोकांचा मृत्यू होतो आहे. अगदी बरे होण्याच्या मार्गावर असलेले रुग्णही आपला जीव सोडत आहेत, असं डॉक्टरांनी सांगितलं. अशात मरणाच्या दारातूनही परत येऊन कोरोनावरही मात करणं म्हणजे एखाद्या चमत्कारापेक्षा कमी नाही. असाच चमत्कार झाला तो मुंबईतील (Mumbai) 75 वर्षांच्या (75 year old patient recovering from coronavirus) शैलजा नकवे (Shailaja Nakwe) यांच्याबाबत. डॉक्टरांनी तर त्या जगतील अशी आशाही सोडली होती. पण या डायबेटिक आजीबाईंनी मात्र मृत्यूलाही चकवा दिला आणि फक्त 13 दिवसांत कोरोनावरही मात केली आहे. शैलेजा नकवे या मुंबईच्या घाटकोपरमध्ये राहणाऱ्या. त्यांना कोरोना झाला होता. त्यांच्या शरीरातील ऑक्सिजनची पातळी 69 टक्क्यांवर आली होती. त्यांची प्रकृती तेव्हाच खूप गंभीर होती. त्यांना सोनाग्रा मेडिकल आणि सर्जिकल सेंटरमध्ये कोरोना उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. टाइम्स ऑफ इंडियाशी बोलताना डॉ. राजाराम सोनाग्रा यांनी सांगितलं, या रुग्णाला मधुमेह होता. त्यांचं फुफ्फुसही फार कार्य करत नव्हतं. त्यांना श्वास घ्यायला खूपच त्रास होत होता. हे वाचा - सकारात्मक विचार आणि पोटावर झोपणे या जोरावर 82 वर्षीय आजींची कोरोनावर मात डॉक्टरांनी तर शैलेजा या 24 तासांपेक्षा जास्त वेळ जगूच शकत नाही, असं सांगितलं होतं. डायबेटिज आणि त्यात कोरोना यामुळे त्यांची प्रकृती खूपच गंभीर होती. डॉक्टरांनी आशा सोडली असली तरी शैलेजा यांनी हार मानली नाही. शैलेजा यांना इतर कोरोना रुग्णांप्रमाणेच रेमडेसिवीर आणि इतर काही अँटिबायोटिक्स देण्यात आले. त्यांचा मुलगा प्रशांतनेही धीर सोडला नाही. तोसुद्धा आईला वाचवण्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न करत होता. धडपडत करत होता. डॉक्टरांनी जरी आशा सोडली तरी त्याने मात्र आशा सोडली नव्हती. हे वाचा - कोरोनाची भयंकर परिस्थिती पाहून कोरोना योद्धेही बिथरले! ढासळतंय मानसिक आरोग्य अखेर शैलेजा यांनी कोरोनाशी जिद्दीने लढा देत त्याला हरवलंही. 13 दिवसांतच त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला. त्यावेळी रुग्णालयात केक कापून हा आनंद साजरा करण्यात आला. त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला असला तरी पूर्णपणे बरं होण्यासाठी त्यांना सहा महिने लागतील. सध्या त्यांना घरी ऑक्सिजनवर ठेवण्यात आलं आहे, जेणेकरून त्यांना श्वास घेताना त्रास होणार नाही. पण मरणाच्या दारातूनही त्या परत आल्या हेच खूप मोठं आहे.
  Published by:Priya Lad
  First published: