नवी दिल्ली, 12 डिसेंबर: घरात एकट्याच असलेल्या (Living alone) ज्येष्ठ नागरिक महिलेचा (Senior citizen woman) खून (Murder) झाल्याची घटना उघड झाल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. शहरांमध्ये सध्या घरात एकटं राहणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांची संख्या मोठी आहे. मुलं बाहेरगावी असल्याने आणि मुली सासरी गेल्यानंतर म्हातारपणी अनेक वृद्धांना एकटं राहावं लागतं. या परिस्थितीचा गैरफायदा घेत लुटारूनं वृद्धेचा खून करून संपत्ती लुटल्याचा प्रकार समोर आला आहे.
असा झाला हल्ला
दिल्लीतील राजेंद्रनगर परिसरात एक 80 वर्षांच्या आज्जी राहत होत्या. त्यांच्या पतीचं काही वर्षांपूर्वी निधन झालं. दोन मुलींपैकी एक मुलगी स्वित्झर्लंडला तर दुसरी सफरदरगंज परिसरात राहते. नेहमीप्रमाणे मुलीने घरी फोन केला असता आई फोन उचलत नसल्याचं तिच्या लक्षात आलं. त्यामुळे शेजारी फोन करून त्यांनी आईची चौकशी करण्याची विनंती केली. जेव्हा शेजाऱ्यांनी दार उघडून परिस्थिती पाहिली, तेव्हा रक्ताच्या थारोळ्यात पडलेला आजींचा मृतदेह त्यांना दिसला. त्यानंतर शेजाऱ्यांनी मुलीला याची कल्पना दिली आणि पोलिसांना फोन करून परिस्थिती कळवली.
भाजीवाल्याने केला खून
पोलिसांनी केलेल्या तपासात भाजीवाल्याने वृद्ध महिलेचा खून केल्याचं दिसून आलं. या आजी रोज ज्या भाजीवाल्याकडून भाजी घ्यायच्या, त्यानेच डोक्यात वीट मारून त्यांना बेशुद्ध केलं आणि घरातील दागिने लंपास केले. त्याने तिजोरी उघडून पैसे लुटण्याचाही प्रयत्न केला, मात्र तिथं काहीच नसल्यामुळे चोराची निराशा झाली. घरात लावलेल्या सीसीटीव्हीत भाजीवाल्याचा चेहरा कैद झाल्याचं दिसल्यावर पोलिसांनी त्याला अटक केली.
हे वाचा- पत्नीला घेऊन जाण्यास नकार देणाऱ्या सासऱ्याचा जावयाकडून खून
ज्येष्ठ नागरिक असुरक्षित
दिल्लीमध्ये ज्येष्ठ नागरिक असुरक्षित असून त्यांच्यावर वारंवार हल्ले होत असल्याचं दिसून आलं आहे. 2020 साली 6 ज्येष्ठ नागरिकांची हत्या झाली होती, 2019 साली 7 तर 2018 साली 14 ज्येष्ठ नागरिकांना आपले प्राण गमवावे लागले होते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Crime, Delhi, Murder, Police, Senior citizen