Home /News /crime /

जगलो तर सोबतच! वृद्धानं पत्नीच्या जळत्या चितेवर घेतली उडी, हृदय पिळवटून टाकणारी घटना

जगलो तर सोबतच! वृद्धानं पत्नीच्या जळत्या चितेवर घेतली उडी, हृदय पिळवटून टाकणारी घटना

(File Photo)

(File Photo)

एका व्यक्तीनं आपल्या पत्नीच्या मृत्यूनंतर तिच्या अंत्यसंस्कारावेळी पत्नीच्या जळत्या चितेवर उडी (Man Jumps into Wife’s Funeral) घेतली. या घटनेत गंभीर जखमी झालेल्या पतीचाही मृत्यू झाला.

    भुवनेश्वर 26 ऑगस्ट : एक अत्यंत हृदयद्रावक घटना नुकतीच समोर आली आहे. या घटनेत आपल्या पत्नीच्या मृत्यूमुळे धक्का बसलेल्या व्यक्तीनं टोकाचं पाऊल उचललं आहे. एका व्यक्तीनं आपल्या पत्नीच्या मृत्यूनंतर तिच्या अंत्यसंस्कारावेळी पत्नीच्या जळत्या चितेवर उडी (Man Jumps into Wife’s Funeral) घेतली. या घटनेत गंभीर जखमी झालेल्या पतीचाही मृत्यू झाला. ही घटना ओडिशाच्या (Odisha) कालाहांडी जिल्ह्यातील आहे. अन् फोटोतील तिघांनी सोडलं जग, एकटीच महिला उरली; साताऱ्यातील खळबळजनक घटना पोलिसांनी बुधवारी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना मंगळावरी जिल्ह्यातील गोलामुंडा ब्लॉकच्या सिआलजोडी गावात घडली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अंत्यसंस्कारानंतर निलामणी सबर यांची चार मुलं आणि नातेवाईक परंपरेनुसार शेजारीच असलेल्या जलाशयात स्नानासाठी गेले. मात्र, निलामणी तिथेच एका कोपऱ्यात बसून रडत होते. अचानक ते उठले आणि जळत्या चितेवर त्यांनी उडी घेतली. तिथे उपस्थित असलेल्या लोकांना काही समजण्याआधीच निलामणी सबर यांनी आपल्या पत्नी रायबडी यांच्या जळत्या चितेवर उडी घेतली. पाण्यात दिसला मृतदेह; विचित्र घटनेचा पोलीस सेक्स डॉलच्या मदतीनं करतायेत तपास या घटनेत आगीत उडी घेणाऱ्या व्यक्तीचं वय 65 वर्ष तर त्यांच्या मृत पत्नीचं वय 60 वर्ष होतं. मृत व्यक्ती हा ग्रामपंचायतीचा माजी सदस्यही होता. केगाव पोलीस ठाण्याचे प्रभारी निरीक्षक दामू पजारा यांनी सांगितलं की, कुटुंबीयांनी पोलिसांना घटनेची माहिती दिलेली नाही. मिळालेल्या माहितीनुसार, रायबरी यांचा मृत्यू कार्डिअ‍ॅक अरेस्टमुळे झाला होता. नवऱ्यानंतर आईनंही घेतला जगाचा निरोप; हताश महिलेनं लेकीसह असा केला आयुष्याचा शेवट
    Published by:Kiran Pharate
    First published:

    Tags: Crime news, Viral news

    पुढील बातम्या