नवी दिल्ली 26 ऑगस्ट : असं म्हटलं जातं की डोळ्यांनी पाहिलेल्या आणि कानांनी ऐकलेल्या गोष्टी कधीच खोट्या नसतात. मात्र, कधी कधी डोळ्यांनी पाहिलेल्या गोष्टीही खोट्या ठरू शकतात. अशाच एका प्रकरणानं फ्रान्सच्या (France) ब्रायनन पोलिसांची (Police) डोकेदुखी वाढवली आहे. पोलीस हत्येच्या (Murder) एका घटनेची माहिती मिळताच तात्काळ घटनास्थळी पोहोचले. मात्र आता ही केस सेक्स डॉलकडे (Sex Doll) वळाली आहे. पोलीस सध्या या सेक्स डॉलच्या मालकाला शोधत आहेत. VIDEO - मुंगूसापेक्षाही भारी पडला कोंबडा! प्रतिकार दूर सापाने भीतीनेच ठोकली धूम फ्रान्सच्या ब्रायननमध्ये एक कपल मॉर्निंग वॉकसाठी (Morning Walk) बाहेर निघालं होतं. यादरम्यान झाडांच्या मागे असलेल्या पाण्यात त्यांनी असं काही पाहिलं की ते हैराण झाले. त्यांनी तात्काळ पोलिसांनी फोन करत याबाबतची माहिती दिली की नदीमध्ये एक मृतदेह तरंगत आहे. पोलीस लगेचच घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी जेव्हा मृतदेह बाहेर काढला तेव्हा भलतंच काही समोर आलं. 1500 वर्षांपूर्वी मिठी मारली अन् दोघांनी सोडला जीव, आज सापडले सांगाडे! Metro च्या रिपोर्टनुसार, पोलिसांनी जेव्हा मृतदेह बाहेर काढला तेव्हा दिसलं की ही एक सेक्स डॉल आहे. पोलीस या कॉलमुळे चिंतेत होते मात्र मृतदेह न आढळल्यानं त्यांनी सुटकेचा श्वास घेतला. पोलीस आता सेक्स डॉलच्या मालकाचा शोध घेत आहेत. पोलिसांनी सेक्स डॉलच्या मालकाला ठाण्यात बोलावलं आहे. ही सेक्स डॉल प्लास्टिकमध्ये बांधून पाण्यात सोडण्यात आली होती. दुरून ती एखाद्या मृतदेहाप्रमाणेच दिसत होती. याच कारणामुळे पोलिसांना बोलावणाऱ्या कपलचा गोंधळ झाला.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.