जाहिरात
मराठी बातम्या / क्राइम / पोलीस अधिकाऱ्याचं तरुणीशी अश्लील चॅट व्हॅायरल, रूममध्ये ये आणि...

पोलीस अधिकाऱ्याचं तरुणीशी अश्लील चॅट व्हॅायरल, रूममध्ये ये आणि...

तरुणीला पोलीस ठाण्यात तक्रार देण्याचे भीषण परिणाम भोगावे लागले.

तरुणीला पोलीस ठाण्यात तक्रार देण्याचे भीषण परिणाम भोगावे लागले.

हळूहळू तो अश्लील चॅट करू लागला. इतकंच नाही, तर तो तिला त्याच्या रूमवर येण्यासाठीही जबरदस्ती करू लागला.

  • -MIN READ Local18 Kanpur Nagar,Uttar Pradesh
  • Last Updated :

अखंड प्रताप सिंह, प्रतिनिधी कानपूर, 30 जून : आपल्यासोबत अन्याय झाला, तर पोलिसांकडे जावं की नाही, याबाबतही आता विचार करावा लागणार आहे. उत्तर प्रदेशातील एका तरुणीला कानपूरच्या पोलीस ठाण्यात तक्रार देण्याचे भीषण परिणाम भोगावे लागले. तिने ज्या पोलिसाकडे तक्रार दाखल केली, त्यानेच तिचा नंबर घेऊन चक्क तिच्याशी गप्पा मारायला सुरुवात केली. पोलिसाच्या धाकाने मुलगीही त्याच्याशी बोलू लागली, मात्र हळूहळू तो अश्लील चॅट करू लागला. इतकंच नाही, तर तो तिला त्याच्या रूमवर येण्यासाठीही जबरदस्ती करू लागला. या दोघांचं हे चॅट सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी प्रकरणाची दखल घेऊन या शुभम सिंह नामक पोलिसाला निलंबित केलं. त्याचबरोबर प्रकरणाच्या चौकशीचेही आदेश देण्यात आले. जाणून घेऊया, नेमकं घडलं काय?

News18लोकमत
News18लोकमत

हे प्रकरण आहे कानपूरच्या गोविंद पोलीस स्थानक परिसरातील. पीडित तरुणीचे मामा हरवले म्हणून ती रतनलाल नगरात पोलीस तक्रार करण्यासाठी गेली होती. या पोलीस चौकीचा प्रभारी शुभम सिंह याने तक्रार नोंदवून घेऊन पीडितेच्या मोबाईल क्रमांकावर तिला व्हॉट्सऍप मेसेज करण्यास सुरुवात केली. माझ्या रूमवर ये मग सगळ्या समस्या सुटतील, अशी अश्लील भाषा तो वापरू लागला. वारंवार तो मुलीला रूमवर बोलवू लागला. काही दिवसांनी हे चॅट सोशल मीडियावर व्हायरल झालं आणि प्रकरण उघडकीस आलं. ‘हम दिल दे चुके सनम…’ हा तर निघाला खरा अजय देवगण! बायकोचं लावलं प्रियकराशी लग्न या प्रकरणाच्या प्राथमिक तपासातच मुलीच्या आरोपांत तथ्य असल्याचं आढळलं. त्यानंतर पोलीस उपायुक्तांनी तातडीने शुभम सिंहच्या निलंबनाचे आदेश जारी केले. शिवाय त्याची चौकशीही करण्यात आली.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात