• Home
 • »
 • News
 • »
 • crime
 • »
 • माणुसकीला काळिमा! नर्सकडून 2 महिन्यांच्या बाळाला अमानुष मारहाण; हातही मोडला, CCTV फुटेजमुळे खुलासा

माणुसकीला काळिमा! नर्सकडून 2 महिन्यांच्या बाळाला अमानुष मारहाण; हातही मोडला, CCTV फुटेजमुळे खुलासा

एक नर्स दोन महिन्यांच्या बाळाला अमानुष मारहाण करताना दिसत (Nurse Captured in CCTV While Beating 2 Month Old Boy) आहे. ही घटना 24 जुलैला रात्री घडल्याचं समोर आलं आहे

 • Share this:
  नवी दिल्ली 30 जुलै : दिल्लीच्या (Delhi) एका रुग्णालयातील धक्कादायक सीसीटीव्ही फुटेज समोर आलं आहे. यात एक नर्स दोन महिन्यांच्या बाळाला अमानुष मारहाण करताना दिसत (Nurse Captured in CCTV While Beating 2 Month Old Boy) आहे. ही घटना 24 जुलैला रात्री घडल्याचं समोर आलं आहे. हे प्रकरण उघड झाल्यानंतर पोलिसांनी (Police) आरोपी नर्सला अटक केला आहे. पोलीस सध्या या प्रकरणाचा तपास करत आहेत. उत्तर प्रदेशच्या हाथरसमध्ये (Hathras) राहणाऱ्या एका कुटुंबाने आपल्या 2 महिन्यांच्या बाळाला उपचारासाठी दिल्लीच्या विवेक विबार नर्सिंग होममध्ये (Nursing Home) भर्ती केलं होतं. नर्सिंग होममध्ये बाळाचे वडील दिवसातून एकदा त्याला पाहण्यासाठी येत असत. कारण, तिथे थांबण्याची परवानगी नव्हती. इतक्यात 24 जुलै रोजी त्यांना नर्सिंग होममधून फोन आला आणि सांगितलं गेलं, की तुमच्या बाळाला दुखापत झाली आहे आणि त्याचा हातही फ्रॅक्चर झाला आहे. बाळाचा चेहराही सुजलेला होता. चार महिन्यांपासून सुरू होता गैरप्रकार; कंटाळून नगरमधील 2 बहिणींनी केलं विषप्राशन वडिलांच्या म्हणण्यानुसार, नर्सिंह होममधील सीसीटीव्ही कॅमेऱ्याचं फुटेज चेक केलं गेलं. यात एक नर्स चिमुकल्याला मारहाण करताना दिसली. यानंतर बाळाचे वडील सबीब यांनी विवेक विहार ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी तक्रार दाखल करून घेतली. सबीब यांच्या म्हणण्यानुसार, त्यांची पत्नी गुलाफ्शानं 22 मे रोजी हाथरसच्या रुग्णालयात जुळ्या बाळांना जन्म दिला होता. यानंतर १६ जुलै रोजी मुलगा अहान याची तब्येत बिघडल्यानं त्याला अलिगढमधील रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र, इंफेक्शन जास्त असल्यानं त्यांनी त्याला दिल्लीच्या विवेक विहारच्या केयर न्यू बॉर्न अँड चाईल्ड सेंटरमध्ये अॅडमिट केलं. मुंबईत डिलिव्हरी बॉयला शिवसैनिकांची बेदम मारहाण, चौघांना अटक सबीब यांच्या म्हणण्यानुसार, सीसीटीव्ही फुटेजमधून खुलासा झाला की सौम्या नावाची नर्स 24 जुलैला पहाटे साडेतीनच्या सुमारास बाळाला मारताना दिसली. सबीबला नर्सिंग होमकडून शांत राहाण्याची धमकीही दिली गेली. यानंतर बाळाला दुसऱ्या रुग्णालयात दाखल करून चेकअप केलं असता बाळाचा हातही फ्रॅक्चर झाल्याचं समोर आलं.
  Published by:Kiran Pharate
  First published: