मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /चार महिन्यांपासून सुरू होता गैरप्रकार; कंटाळून नगरमधील अल्पवयीन बहिणींनी केलं विषप्राशन

चार महिन्यांपासून सुरू होता गैरप्रकार; कंटाळून नगरमधील अल्पवयीन बहिणींनी केलं विषप्राशन

अकरावीत शिकणाऱ्या एका अल्पवयीन मुलीनं सोमवारी आपल्या आयुष्याचा शेवट केला आहे.  (File Photo)

अकरावीत शिकणाऱ्या एका अल्पवयीन मुलीनं सोमवारी आपल्या आयुष्याचा शेवट केला आहे. (File Photo)

Crime in Ahmednagar: अहमदनगरमध्ये दोन अल्पवयीन बहिणींनी (Two Minor sisters) विषारी कीटकनाशक औषध प्राशन (Drink Poison) करून आत्महत्या करण्याचा (Commits suicide) प्रयत्न केला आहे. यातील एका मुलीचा मृत्यू झाला असून दुसरी मुलगी आयुष्याशी झुंज देत आहे.

पुढे वाचा ...

पारनेर, 30 जुलै: अहमदनगर (Ahmednagar) जिल्ह्याच्या पारनेर तालुक्यातील पिंपळगाव याठिकाणी दोन अल्पवयीन चुलत बहिणींनी (Minor sisters) विषारी कीटकनाशक औषध प्राशन (Drink Poison) करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न (Suicide) केला आहे. यातील एका मुलीचा उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू (Death) झाला आहे. तर दुसरी मुलगी आपल्या आयुष्याशी झुंज देत आहे. नातेवाईकांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी त्याच गावातील दोन तरुणांना अटक (2 Arrest) केली आहे. पीडित मुलगी शुद्धीवर आल्यानंतर, त्यांच्या आत्महत्या करण्यामागील कारण स्पष्ट होईल, अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.

दोघी पीडित बहिणी अलीकडेच दहावीची परीक्षा उत्तीर्ण झाल्या होत्या. दरम्यान काल दुपारी दीडच्या सुमारास पीडित चुलत बहिणींनी विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. मुलींनी आत्महत्या केल्याची बाब लक्षात येताच, कुटुंबीयांनी त्यांना त्वरित पुणे जिल्ह्यातील शिरूर याठिकाणी उपचारासाठी दाखल केलं आहे. याठिकाणी एका मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तर दुसऱ्या मुलीवर उपचार सुरू आहेत. संबंधित मुलीच्या प्रकृतीत सुधारणा होतं असल्याची माहिती डॉक्टरांकडून देण्यात आली आहे.

हेही वाचा-'शिकवणीसाठी येणाऱ्या मुलींवर बलात्कार करतो पती'; महिलेनं कोर्टात धाव घेत मागितली

चार महिन्यापासून सुरू होता त्रास

पिंपळनेर गावातील बारावीत शिकणारे दोन मुलं मागील चार महिन्यांपासून पीडित मुलींचा पाठलाग करत होते. आरोपी तरुण त्यांची नेहमी छेड (Molestation) काढत होते. संबंधित आरोपींना अनेकदा समजावून सांगण्याचा प्रयत्न केला गेला. पण आरोपींची खोड मोडली नाही. त्यांच्याकडून पीडित मुलींना त्रास सुरूच राहिला, मागील चार महिन्यांपासून त्यांच्यासोबत सुरू असलेल्या छेडछाडीच्या त्रासाला कंटाळून पीडित बहिणींनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला असावा, असा दावा पीडितेच्या कुटुंबीयांकडून करण्यात आला आहे.

हेही वाचा-दुबईतून Online सुपारी, कर्नाटकात हत्या; पत्नीच्या हत्येचा असा आखला प्लान

पोलिसांनी संबंधित दोन्ही अठरा वर्षीय आरोपी तरुणांना अटक केली आहे. पोलीस या घटेनचा पुढील तपास करत आहेत. उपचार सुरू असलेली दुसरी मुलगी शुद्धीवर आल्यानंतर आत्महत्येचं गूढ उलगडणार आहे. पीडितेच्या प्रकृतीत सुधारणा झाल्यानंतप पोलीस तिचा जबाब नोंदवून घेणार आहेत. त्यानंतर पुढील कारवाई करण्यात येईल, अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.

First published:
top videos

    Tags: Ahmednagar, Crime news