इंदूर, 10 डिसेंबर : जर्मनीतील IT कंपनीत काम करणाऱ्या एका इंजीनियरची पत्नीसह मारहाणीची घटना समोर आली आहे. इंजिनिअर पती तिला वारंवार (Crime News) धमकी देत होता. इंजिनिअरच्या पत्नीने जर्मनीतदेखील पतीविरोधात तक्रार (women harasment) केली होती. ज्यात पोलिसांनी पतीला सहा महिन्यांपर्यंत घरापासून वेगळं राहण्याची सूचना दिली. यानंतर मात्र पीडिता भारतात परतली. भोपाळमध्ये आल्यानंतर तिने आई-वडिलांना सर्व हकिकत सांगितली. ज्यानंतर इंदूर पोलिसांनी पतीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. भोपाळमधील डिफेंस सिटी सीआरपीएफ कॅम्पसमध्ये राहणारी प्राची पौराणिक हिचा 22 एप्रिल 2019 मध्ये एलआयजी कॉलनी इंदूर येथे राहणाऱ्या रोहित दुबेसोबत लग्न झालं होतं. लग्नाच्या काही महिन्यांनंतर दोघेही IT कंपनीत नोकरी करण्यासाठी पुण्यात गेले होते. काही दिवसांनंतर प्राचीला कळालं की रोहितला दारू आणि सिगारेटचं व्यसन आहे. ऑक्टोबरमध्ये दिवाळी झाल्यानंतर ते पुन्हा इंदूरला आले. रोहितच्या व्यसनाबद्दल तिने सासू-सासऱ्यांनाही सांगितलं. मात्र त्यांनी रोहितला प्राचीच्या माहेरच्यांकडून हुंड्याची मागणी केली. ज्यानंतर तिला मारहाणही करण्यात आली. यानंतर ती पुन्हा पुण्याला निघून गेली. हे ही वाचा- Love Triangle चा भररस्त्यात तमाशा, पत्नीनं पती आणि गर्लफ्रेंडला धू-धू धुतलं 2020 मध्ये दोघेही नोकरीसाठी जर्मनीला निघून गेले. येथेही रोहीत प्राचीवर संशय घेऊन तिला मारहाण करीत होता. मात्र तरीही प्राची सर्व सहन करीत होती. यानंतर ती दोन वेळा भारतात जाऊन आली. सासू-सासऱ्यांना याबद्दल सांगितल्यानंतरही ते रोहितसोबत राहण्याचा दबाव आणत होते. एकदा तर प्राचीने जर्मनीत असताना पोलिसांना याबाबत सांगितलं. यानंतर सहा महिने रोहितला घरापासून लांब राहण्यास सांगण्यात आलं. अनेक दिवस प्राची सर्व सहन करीत होती. शेवटी या सर्वाचा बांध तुटला आणि ती भारतात परतली. मात्र त्यानंतर तर रोहितने प्राचीला जिवे मारण्याची धमकी दिली. यानंतर तिने पोलीस ठाण्यात पतीविरोधात तक्रार दाखल केली.
जाहिरात
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.