Home /News /national /

हॉटेलमध्ये Girlfriend सोबत सापडलेल्या पतीला पत्नीनं पळवून पळवून मारलं

हॉटेलमध्ये Girlfriend सोबत सापडलेल्या पतीला पत्नीनं पळवून पळवून मारलं

एका हॉटेलमध्ये पतीला (Husband) गर्लफ्रेंडसोबत (Girl Friend)असताना पत्नीनं रंगेहाथ पकडलं. त्यानंतर पत्नीनं पती आणि गर्लफ्रेंडची भररस्त्यात धुलाई केली.

    पश्चिम बंगाल, 10 डिसेंबर: आसनसोलमध्ये (Asansol) गुरुवारी एकच गोंधळ पाहायला मिळाला. हा सर्व गोंधळ होता Love Triangle चा. गुरुवारी आसनसोलच्या एका हॉटेलमध्ये पतीला (Husband) गर्लफ्रेंडसोबत (Girl Friend)असताना पत्नीनं रंगेहाथ पकडलं. त्यानंतर पत्नीनं पती आणि गर्लफ्रेंडची भररस्त्यात धुलाई केली. बर्नपूर रोडवरील एका हॉटेलमध्ये गर्लफ्रेंडसोबत पत्नीनं पतीला रंगेहाथ पकडलं आणि त्यानंतर पत्नीने पती आणि गर्लफ्रेंडची जोरदार धुलाई केली. हातात हेल्मेट घेऊन पत्नीनं दोघांना धू धू धुतलं. सर्वसामान्यांनी याचा व्हिडिओ बनवला असून हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. पतीची गर्लफ्रेंड महिलेला भररस्त्यात पत्नीनं मारहाण केली. आसनसोलच्या बर्नपूर रोडवर ही घटना घडली. पत्नीचा आरोप आहे की, पती बर्नपूर रोडवरील एका खासगी हॉटेलमध्ये दुसऱ्या महिलेसोबत मजा करत होता. यानंतर पत्नीनं गर्लफ्रेंडला हेल्मेटने मारहाण केली, नंतर दोघांना आसनसोल दक्षिण पोलीस चौकीत नेलं. पोलिसांनी पती आणि गर्लफ्रेंडला ताब्यात घेतलं असून त्यांची चौकशी सुरू आहे. हेही वाचा-  क्रूरतेचा VIDEO..! निरागस मुलं रडत राहिलं कुशीत, पोलीस करत होते बापाला मारहाण पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बर्नपूर येथील रहिवासी असलेला मोहनलाल हा आसनसोल बर्नपूर रोडवरील पोलीस स्टेशन हद्दीतील एका हॉटेलमध्ये थांबला होता. त्याच्यासोबत हॉटेलमध्ये एक महिलाही होती. पत्नीनं मोहनलालचा पाठलाग केला. त्यानंतर तिनं हॉटेलच्या खोलीत मोहनलालला आणि त्याच्या गर्लफ्रेंडला रंगेहाथ पकडलं. पत्नीनं त्यांना पोलिसांच्या ताब्यात दिले. त्यावेळचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. या व्हिडिओत पोलिस घेऊन जात असताना महिलेने पतीच्या डोक्यात हेल्मेट मारले. यानंतर तिने गर्लफ्रेंडला रस्त्यातच मारहाण करण्यास सुरुवात केली. पत्नीनं पतीला पळवून पळवून धुतलं मिळालेल्या माहितीनुसार, रस्त्यात पळवून पळवून पत्नीने पतीला मारहाण केली. आसनसोलच्या रहिवाशांनी गुरुवारी असेच दृश्य पाहिले. महिलेनं पतीच्या गर्लफ्रेंडला पोलिसांच्या ताब्यात दिलं. पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा तपास करत असून दोघांची चौकशी करत आहेत.
    Published by:Pooja Vichare
    First published:

    Tags: West bengal

    पुढील बातम्या