मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /Mansukh Hiren death प्रकरणात नवा twist, सचिन वाझेंचा आणखी एक कारनामा समोर

Mansukh Hiren death प्रकरणात नवा twist, सचिन वाझेंचा आणखी एक कारनामा समोर

विनायक शिंदे याने तावडे नावाच्या अधिकाराच्या नावाने मनसुख यांना 4 मार्चच्या रात्री फोन केला होता असं सांगण्यात आलं होतं पण...

विनायक शिंदे याने तावडे नावाच्या अधिकाराच्या नावाने मनसुख यांना 4 मार्चच्या रात्री फोन केला होता असं सांगण्यात आलं होतं पण...

विनायक शिंदे याने तावडे नावाच्या अधिकाराच्या नावाने मनसुख यांना 4 मार्चच्या रात्री फोन केला होता असं सांगण्यात आलं होतं पण...

मुंबई, 06 एप्रिल: मुंबईत स्फोटकांनी गाडी सापडल्या प्रकरणानंतर मनसुख हिरेन (Mansukh Hiren death case) हत्या प्रकरणाचा तपास राष्ट्रीय तपास यंत्रणा अर्थात एनआयए करत आहे. या तपासात एक धक्कादायक खुलासा समोर आला आहे. हत्येच्या आदल्यादिवशी मनसुख यांना तावडे नावाच्या पोलीस कॉन्स्टेबलने फोन केला होता. पण हा फोन सचिन वाझे (Sachin Vaze) यांनीच केला होता, अशी माहिती समोर आली आहे. त्यामुळे या प्रकरणाचा गुंता आणखी वाढला आहे.

मनसुख यांना तावडे नावाच्या एका कांदिवली क्राइम ब्रांचच्या अधिकाऱ्याचा फोन आला म्हणून मनसुख घराबाहेर पडले होते आणि त्यानंतर मनसुख रहस्यमयरित्या गायब झाला होते. तपासात सुरुवातीला असं समोर आलं होतं की, सचिन वाझे यांचा साथीदार विनायक शिंदे याने तावडे नावाच्या अधिकाराच्या नावाने मनसुख यांना 4 मार्चच्या रात्री फोन केला होता आणि त्याची हत्या केली होती पण आता तपासात जी माहिती समोर आली आहे ती अतिशय धक्कादायक आहे.

IPL आधीच वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपची तयारी, हा भारतीय खेळाडू इंग्लडला रवाना

तांत्रिक पुराव्याच्या आधारे NIA ने दावा केलाय की, 4 मार्चच्या रात्री मनसुख जेव्हा त्याच्या दुकानातून घरी गेला आणि घरी जेवत असताना म्हणून मनसुखला व्हॉट्सअप कॉल वरती एक फोन आला होता. त्यानुसार मनसुखने त्याच्या पत्नीला सांगितले होते की 'एका तावडे नावाच्या अधिकाऱ्याने जो अधिकारी कांदिवली क्राइम ब्रांच येथे काम करतो त्याने फोन केला होता आणि कारमायकल रोड गाडी पार्क प्रकरणी आपली चौकशी करायची आहे. त्यामुळे आपण त्या तावडे नावाच्या अधिकाऱ्याला भेटायला चाललो आहोत, असं मनसुखने 4 मार्चच्या रात्री त्याच्या पत्नीला सांगितले होते

पण, 4 मार्चच्या रात्री मनसुख यांना फोन करणारा दुसरा तिसरा कोणी नसून सचिन वाझेच होता आणि सचिन वाझे यांनी व्हॉट्सअप कॉलच्या माध्यमातून मनसुख यांना घराखाली बोलावून घेतले होते. नंतर पुढे सचिन वाझे यांनी मनसुख यांना त्याच्याच काही माणसांच्या हवाली केले त्यानंतर मनसुख रहस्यमयरित्या बेपत्ता झाले आणि 5 मार्चच्या सकाळी 10 वाजून 25 मिनिटांनी मनसुख यांचा मृतदेह ठाण्यातील मुंब्रा रेतीबंदर खाडी येथे आढळून आला.

'...तर 2-4 आठवड्यांतच कोरोना केसेस कमी होतील', कोव्हिड टास्क फोर्सने दिला मंत्र

NIA ने दावा केला कि, त्या रात्री सचिन वाझे याने जो व्हाॅट्सअप कॉल मनसुख यांना केला होता. त्यावेळेस मनसुख हे  त्यांच्या घरी होते आणि त्यांचा मोबाईल घरच्या वायफाय राउटर शी कनेक्टेड होता. त्यावेळी एका नंबर वरून सचिन वाझे याने मनसुखला संपर्क केला होता तो नंबर शोधून काढण्यात महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथक तसंच NIA ला चांगलाच घाम फुटला होता. NIA ने शेवटी तो नंबर शोधून काढत फोन नंबर गुजरातमधील एका क्रिकेट बुकीने म्हणजेच नरेश गोर याने सचिन वाझे आणि विनायक शिंदे याला दिला होता.

याच नंबर वरून या मनसूख प्रकरणात सचिन वाझेचा सहभाग आहे हा तपास यंत्रणांना विश्वास पटला आणि तिथून पुढे सचिन वाझेने केलेले कारनामे आणि त्याने रचलेले कट हे सर्व एके करून तपास यंत्रणांच्या हाती लागले.

सचिन वाझे हे 4 मार्चच्या रात्री म्हणजे मनसुखच्या हत्येच्या रात्री ट्रेनने प्रवास करत ठाण्यात आला होता. हे देखील आता NIA ने पुन्हा रिक्रिएशन करून शोधून काढले आहे. त्यामुळे सचिन वाझे याने मुंबईतच आहे, असं दाखवून ठाण्यात येऊन मनसुखला कशापकारे त्याच्या टीमच्या ताब्यात दिले हे आता तपासात समोर आले आहे.

First published:

Tags: Death, Hiren mansukh, Nia, Sachin vaze, Whatsapp