advertisement
होम / फोटोगॅलरी / क्राईम / जगातील 5 सर्वात मोठे बँक दरोडे, चित्रपटालाही लाजवेल असं प्लॅनिंग

जगातील 5 सर्वात मोठे बँक दरोडे, चित्रपटालाही लाजवेल असं प्लॅनिंग

Biggest Bank Robberies in World: जगात आजपर्यंत अनेक बँकांवर दरोडे पडले आहेत. त्यापैकी काही दरोडे तर अतिशय नियोजनबद्ध पद्धतीनं टाकले गेले आहेत. एखाद्या चित्रपटाच्या कथानकालाही साजवेल असं त्याचं प्लॅनिंग केलं गेलं. आज आपण जगातील इतिहासातील सर्वात मोठ्या 5 बँक दरोड्यांबद्दल माहिती घेणार आहोत.

01
भारतीय चित्रपट असो की हॉलिवूड, बँक लुटण्याशी संबंधित चित्रपट चित्रपटसृष्टीत बनवले जातात. आता लोकांना मनी हेस्ट सारख्या स्पॅनिश वेबसिरीज देखील आवडत आहेत, ज्याची थीम बँक चोरीवर आधारित आहे. तुम्हाला वाटू शकते की ज्याप्रमाणे चित्रपटांमध्ये दाखवला जातो, तसं प्रत्यक्षात घडू शकत नाही पण हे खरे नाही! जगात आजपर्यंत अनेक बँकांवर दरोडे पडले आहेत. त्यापैकी काही दरोडे तर अतिशय नियोजनबद्ध पद्धतीनं टाकले गेले आहेत. एखाद्या चित्रपटाच्या कथानकालाही साजवेल असं त्याचं प्लॅनिंग केलं गेलं. आज आपण जगातील इतिहासातील सर्वात मोठ्या 5 बँक दरोड्यांबद्दल माहिती घेणार आहोत. हा अहवाल थ्रिलिस्ट, बिझनेस इनसाइडर आणि इतर अनेक आघाडीच्या वेबसाइट्सच्या आधारे तयार करण्यात आला आहे.

02
2005 मध्ये ब्राझीलमधील फोर्टालेझा येथे अशी चोरी झाली होती की ज्याचा तुम्ही विचार करू शकत नाही आणि जी फक्त चित्रपटांमध्येच दिसू शकते. चोरट्यांनी बँको सेंट्रल बँकेच्या शाखेजवळ एक व्यावसायिक मालमत्ता भाड्याने घेतली आणि नंतर त्यामध्ये काम सुरू केले. चोरांनी 256 फुटांचा बोगदा खोदला जो थेट बँकेच्या तिजोरीपर्यंत पोहोचत होता. बोगदा खोदल्यानंतर ऑगस्ट महिन्यात त्यांनी सुमारे 3.5 टन ब्राझिलियन नोटा लुटल्या. या चोरीमध्ये 70 दशलक्ष डॉलर्स म्हणजेच 500 कोटी रुपये लुटले गेले. (प्रतिकात्मक छायाचित्र: कॅनव्हा)

03
वर्ष 2003 मध्ये इराकमधी बगदाद येथील इराकच्या सेंट्रल बँकेत चोरी झाली होती. तज्ज्ञांनी ही चोरी जगातील आतापर्यंतची सर्वात मोठी बँक दरोडा असल्याचं म्हटलं आहे. या चोरीमध्ये एकूण 920 दशलक्ष डॉलर्स म्हणजेच सुमारे 7 हजार कोटींची लूट झाल्याचा दावा केला जात आहे. वृत्तानुसार सद्दाम हुसेनने या चोरीसाठी कथितरित्या सूचना दिल्या होत्या. सद्दामच्या मुलानं अज्ञात व्यक्तीसोबत हे पैसे दुसऱ्या ठिकाणी हलवल्याचं बोललं जातं. गहाळ झालेल्या पैशांपैकी किती रक्कम सापडली हे कुणालाच माहीत नाही, पण एकदा हुसैनच्या घरावर छापा टाकला तेव्हा तेथून 650 दशलक्ष डॉलरस् जप्त करण्यात आले.

04
1987 मध्ये इटलीचा कुख्यात गुन्हेगार व्हॅलेरियो व्हिसेई याने लंडनमधील बँक लुटून सुमारे 800 कोटी रुपये लुटले होते. चोरी करण्याची पद्धत अत्यंत खास होती. व्हॅलेरियो आपल्या एका साथीदारासह खातं उघडण्याच्या बहाण्यानं बँकेत पोहोचला आणि मॅनेजरला बंधक बनवलं. यानंतर त्याने त्याच्या उर्वरित साथीदारांना आत बोलावलं आणि सर्वांनी दागिने, नोटा आणि इतर मौल्यवान वस्तूंच्या रूपात बँकेतून 800 कोटी रुपये काढून घेतले. मग व्हॅलेरियो दक्षिण अमेरिकेत पळून गेला आणि काही काळ आपले जीवन मुक्तपणे जगला. परंतु त्याच्या मूर्खपणामुळं नंतर तो पोलिसांच्या हाती लागला. दरम्यान ब्रिटिश सुरक्षा विभागाचे लोक त्याच्याकडे चौकशी करत होते. याचदरम्यान व्हॅलेरियो दक्षिण अमेरिकेत आपली फेरारी कार पाठवण्यासाठी इंग्लंडला परतला. त्याचवेळी त्याला ताब्यात घेण्यात आले.

05
या चोरीपासून प्रेरित होऊन अनेक चित्रपटांमध्ये सीन लिहिण्यात आले आहेत. 1963 मध्ये बकिंगहॅमशायर, इंग्लंडमध्ये ही चोरी झाली होती. रॉयल मेल ट्रेन ग्लासगोहून येत होती. त्यात अनेक मौल्यवान वस्तू होत्या. 15 चोरट्यांनी ही चोरी केली. त्यासाठी काही महिने अगोदरपासूनच त्यांनी नियोजन केलं होतं. त्यांनी ट्रॅकवरील सिग्नलशी छेडछाड केल्यामुळे ट्रेन एका निर्जन भागात थांबली आणि तिथेच त्यांनी ट्रेन लुटली. या चोरीमध्ये त्यावेळी सुमारे 33 कोटी रुपयांचा ऐवज लुटण्यात आला होता.

06
1997 मध्ये अमेरिकेतील लॉस एंजेलिस येथे असलेल्या डनबार आर्मर्ड रॉबरीमध्ये चोरी झाली होती. या चोरीतील आश्‍चर्यकारक बाब म्हणजे या चोरीचा मुख्य सूत्रधार बँकेतच सुरक्षा निरीक्षक होता. त्याने चोरीसाठी त्याच्या 5 मित्रांची निवड केली आणि बँकेतील प्रत्येक कमकुवत लिंक समजावून सांगितली. त्याने 150 कोटींहून अधिक रोख घेऊन पळ काढला. मात्र नंतर एका चोरट्यानं गुन्ह्याची कबुली दिली आणि ते सर्व पकडले गेले.

  • FIRST PUBLISHED :
  • भारतीय चित्रपट असो की हॉलिवूड, बँक लुटण्याशी संबंधित चित्रपट चित्रपटसृष्टीत बनवले जातात. आता लोकांना मनी हेस्ट सारख्या स्पॅनिश वेबसिरीज देखील आवडत आहेत, ज्याची थीम बँक चोरीवर आधारित आहे. तुम्हाला वाटू शकते की ज्याप्रमाणे चित्रपटांमध्ये दाखवला जातो, तसं प्रत्यक्षात घडू शकत नाही पण हे खरे नाही! जगात आजपर्यंत अनेक बँकांवर दरोडे पडले आहेत. त्यापैकी काही दरोडे तर अतिशय नियोजनबद्ध पद्धतीनं टाकले गेले आहेत. एखाद्या चित्रपटाच्या कथानकालाही साजवेल असं त्याचं प्लॅनिंग केलं गेलं. आज आपण जगातील इतिहासातील सर्वात मोठ्या 5 बँक दरोड्यांबद्दल माहिती घेणार आहोत. हा अहवाल थ्रिलिस्ट, बिझनेस इनसाइडर आणि इतर अनेक आघाडीच्या वेबसाइट्सच्या आधारे तयार करण्यात आला आहे.

    MORE
    GALLERIES

advertisement
advertisement