मुंबई 07 ऑक्टोबर : एनसीबीने मोठी कारवाई करत मुंबईतील ड्रग्ज तस्करीचं रॅकेट उघडकीस आणलं आहे. यात 50 किलो एमडी ड्रग्ज पकडण्यात आले असून या संपूर्ण प्रकरणात आतापर्यंत 4 लोकांना अटक करण्यात आली आहे. यासोबतच जामनगरमधून मिळालेल्या माहितीनंतर तिथूनही 10 किलो एमडी ड्रग्ज पकडण्यात आले आहेत. मुंबई आणि जामनगरमधून एकत्रित 60 किलो एमडी ड्रग्ज जप्त करण्यात आले आहेत. बापरे! वाशीतून चक्क 1476 कोटींचे ड्रग्ज जप्त, DRI ची सर्वात मोठी कारवाई जागतिक बाजारपेठेत या 60 किलो एमडी ड्रग्जची किंमत 120 कोटी इतकी आहे . मुंबईतील 3 नागरिकांना याप्रकरणी एनसीबीने अटक केली आहे. एनसीबी मुंबई , जामनगर नेव्हल युनिट, एनसीबी जामनगर यांनी एकत्रितपणे ही कारवाई केली. या प्रकरणी एकूण 4 जणांना अटक केली असून यातील ३ मुंबई तर १ जामनगरमधील आहे. मुंबई आणि गुजरात राज्यात हे रॅकेट सक्रिय झाले होते. जामनगरमधून सोहेल गफार रहीदा याला अटक करण्यात आली आहे. तो एअर इंडिया विमानात पायलट होता. मात्र, मेडीकल कारणास्तव त्याने एअर इंडिया सोडल्यानंतर एमडी तस्करीचं काम सुरू केलं. सोहेलने अमेरिकेतून पायलटचे प्रशिक्षण घेतले आहे. यापूर्वी त्याने एअर इंडियामध्ये काम केले आहे. महिलेने केनियाहून सँडलमध्ये लपवून आणले कोट्यावधींचे ड्रग्ज, मुंबई विमानतळावर येताच… तर, दुसरा आरोपी मिथेन बिचाई दास याला 2001 मध्ये एनडीएच्या तस्करीत अटक करण्यात आली होती. परंतु बेल मिळाल्यानंतर तो पुन्हा या तस्करीत सक्रिय सहभागी असल्याचं आढळून आलं. 225 किलो एमडी ड्रग्ज या टोळीने मागच्या वर्षी वितरीत केले असल्याचं समोर आलं आहे. मुंबईतील एका प्रयोगशाळेत हे एमडी ड्रग्ज बनवले जात होते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.