मुंबई, 1 ऑक्टोबर : मुंबईच्या महसूल गुप्तचर संचालनालयाच्या (DRI) अधिकाऱ्यांनी खूप मोठी कारवाई केली आहे. डीआरआयच्या (Directorate of Revenue Intelligence) अधिकाऱ्यांनी आज नवी मुंबईच्या वाशी येथून एक ट्रक पकडला आहे. हा ट्रक आयात होणाऱ्या संत्र्यांची वाहतूक करतो. या ट्रकला पकडल्यानंतर खूप मोठ्या काळाबाजाराचा भंडाफोड झाला आहे. या संत्र्यांच्या ट्रकमध्ये खूप मोठा काळाबाजार सुरु होता. कारण डीआरआयच्या अधिकाऱ्यांना या ट्रकमध्ये आज एक-दोन नव्हे तर तब्बल 1476 कोटी रुपयांचे ड्रग्ज सापडले आहेत. हे ड्रग्ज पाहून अधिकारी देखील हैराण झाले. ड्रग्जवर बंदी असताना आरोपी इतक्या चाणाक्ष पद्धतीने काळाबाजार कसा करु शकतात? या विचाराने अधिकारी देखील चक्रावले आहेत. याप्रकरणी डीआरआयने तातडीने कारवाई करण्यास सुरुवात केलीय. ‘एएनआय’ने याबाबतचं वृत्त दिलं आहे. डीआरआयने संबंधित ट्रक पकडल्यानंतर त्या ट्रकमध्ये नेमंक काय आहे याची झडती घेण्यास सुरुवात केली. ट्रकचालक आणि त्याच्यासोबत असणाऱ्या व्यक्तीने ट्रकमध्ये संत्री असल्याची माहिती दिली. पण अधिकाऱ्यांना संशय आलेला होता. त्यामुळे त्यांनी ट्रकची झडती घेतली. यावेळी ट्रकमध्ये 198 हाय प्युरीटी क्रिस्टल मेथॅम्फेटामाइन (बर्फ) आणि 1476 कोटी रुपयांचे 9 किलो हाय प्युरीटी कोकेन आढळले. ते पाहून अधिकारी देखील हैराण झाले.
Maharashtra | Directorate of Revenue Intelligence (DRI), Mumbai recovered 198 kg high purity crystal methamphetamine (ice) & 9 kg high purity cocaine worth Rs 1476 crores after a truck carrying imported oranges was intercepted in Vashi, Mumbai: DRI Mumbai
— ANI (@ANI) October 1, 2022
( महिलेने केनियाहून सँडलमध्ये लपवून आणले कोट्यावधींचे ड्रग्ज, मुंबई विमानतळावर येताच… ) याप्रकरणी डीआरआयने संबंधित ट्रक जप्त केला आहे. तसेच ड्रग्जही जप्त केले आहेत. याशिवाय माल आयत करणाऱ्यांनादेखील अटक केली असून त्यांची चौकशी सुरु आहे. याप्रकरणी पुढील तपास सुरु आहे, अशी माहिती मुंबईच्या डीआरआय विभागाने दिली आहे. आरोपी इतके महागडे ड्रग्ज नेमके कुणाला देणार होते? त्यांनी हे ड्रग्ज पहिल्यांदा मागवलं होतं का? इतकं महाग ड्रग्ज ते कुणाला विकणार होते? यामध्ये मोठी नाव आहेत का? असे अनेक प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहेत.