जाहिरात
मराठी बातम्या / क्राईम / महिलेने केनियाहून सँडलमध्ये लपवून आणले कोट्यावधींचे ड्रग्ज, मुंबई विमानतळावर येताच...

महिलेने केनियाहून सँडलमध्ये लपवून आणले कोट्यावधींचे ड्रग्ज, मुंबई विमानतळावर येताच...

महिलेने केनियाहून सँडलमध्ये लपवून आणले कोट्यावधींचे ड्रग्ज, मुंबई विमानतळावर येताच...

सीमाशुल्क विभागाने मोठी कारवाई करत 490 ग्रॅम कोकेन जप्त केले होते.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

अमित राय, प्रतिनिधी मुंबई, 1 ऑक्टोबर : मुंबईमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. सँडलमध्ये केनिया येथून आलेले 5 कोटीचे ड्रग्स मुंबई विमानतळावर जप्त करण्यात आले आहेत. याची किंमत आंतरराष्ट्रीय बाजारात 4.9 कोटी रुपये असल्याचा अंदाज आहे. काय आहे संपूर्ण प्रकरण - 29 सप्टेंबर रोजी मुंबई विमानतळावर सीमाशुल्क विभागाने मोठी कारवाई करत 490 ग्रॅम कोकेन जप्त केले होते. ज्याची आंतरराष्ट्रीय बाजारात किंमत अंदाजे 4.9 कोटी रुपये आहे. सीमाशुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, हे कोकेन सँडलमध्ये लपवून आणण्यात आले होते. या प्रकरणातील सर्व आरोपींना अटक करून न्यायालयात हजर करण्यात आले. यानंतर त्यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे. ज्या महिलेकडून सीमाशुल्क विभागाने हे कोकेन जप्त केले आहे, ती महिला या कोकेनला केनियाहून घेऊन आली होती. मात्र, मुंबई विमानतळावरील कस्टम अधिकाऱ्यांच्या नजरेतून ती सुटू शकली नाही. या महिलेने तिच्या सँडलखाली पोकळी बनवून कोकेन लपवले होते. हे कोकेन फाइन क्वालिटीचे असल्याचे सांगितले जाते. हेही वाचा -  VIDEO: दिवसाढवळ्या घरात घुसून चोरायची लाखोंचे दागिने; मुंबईतील महिलेनं पोलिसांना आणलं नाकीनऊ, शेवटी.. अंमली पदार्थ जप्तीची ही पहिलीच घटना नाही - दरम्यान, मुंबईच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर अमली पदार्थ जप्त होण्याची ही पहिलीच घटना नाही. याआधीही सीमा शुल्क विभाग आणि एअर इंटेलिजन्स युनिटने अशा अनेक नागरिकांना अटक केली आहे. ज्यांनी वेगवेगळ्या मार्गाने ड्रग्जची तस्करी केली. तस्करांकडून चप्पल किंवा बुटांच्या सोलमध्ये पोकळी निर्माण करून अमली पदार्थांची तस्करी केल्याचे अनेकदा आढळून येते. किंवा काही वेळा सामानात पोकळ जागा निर्माण करून तस्करी केली जाते. मात्र, सीमाशुल्क तपास यंत्रणांच्या माध्यमातून अंमली पदार्थांचे तस्करांना लक्ष ठेवून कारवाई करत त्यांना अटक केली जाते.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Drugs , mumbai
  • First Published :
जाहिरात
जाहिरात