मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /गडचिरोलीत माओवाद्यांचा मोठा घातपाताचा कट उधळला, घटनास्थळावरचा पाहा VIDEO

गडचिरोलीत माओवाद्यांचा मोठा घातपाताचा कट उधळला, घटनास्थळावरचा पाहा VIDEO

माओवाद्यांनी गडचिरोली जिल्ह्यातील मालेवाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत लड्डू झेरा जंगलात त्या मार्गावरून जाणाऱ्या पोलिसांवर स्फोटकाद्वारे हल्ला करवण्याचा प्लॅन आखला होता.

माओवाद्यांनी गडचिरोली जिल्ह्यातील मालेवाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत लड्डू झेरा जंगलात त्या मार्गावरून जाणाऱ्या पोलिसांवर स्फोटकाद्वारे हल्ला करवण्याचा प्लॅन आखला होता.

माओवाद्यांनी गडचिरोली जिल्ह्यातील मालेवाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत लड्डू झेरा जंगलात त्या मार्गावरून जाणाऱ्या पोलिसांवर स्फोटकाद्वारे हल्ला करवण्याचा प्लॅन आखला होता.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Gadchiroli, India

गडचिरोली, 12 ऑक्टोबर : गडचिरोलीत माओवाद्यांकडून वारंवार पोलीस आणि प्रशासनातील अधिकाऱ्यांवर लक्ष्य केलं जातंय. गेल्यावर्षी माओवाद्यांनी रस्त्यावर सुरुंग लावून मोठा घातपात घडवून आणला होता. विशेष म्हणजे माओवाद्यांचा अशाच घटनेची पुनरावृत्ती करण्याचा डाव होता. या माओवाद्यांनी जमिनीखाली स्फोटकं लपवून ठेवली होती. पोलिसांची गाडी आली की मोठा घातपात घडवून आणण्यांचा त्यांचा डाव होता. पण त्याआधी पोलिसांनी याबाबत माहिती मिळाली आणि मोठा अनर्थ टळला. गडचिरोली पोलिसांनी माओवाद्यांचा घातपाताचा मोठा कट उधळला आहे. पोलिसांची ही सर्वात मोठी आणि महत्त्वाची कारवाई मानली जात आहे.

माओवाद्यांनी गडचिरोली जिल्ह्यातील मालेवाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत लड्डू झेरा जंगलात त्या मार्गावरून जाणाऱ्या पोलिसांवर स्फोटकाद्वारे हल्ला करवण्याचा प्लॅन आखला होता. त्यासाठी त्यांनी स्फोटकं पेरुन ठेवली होती. याबाबत गडचिरोली पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर ते तातडीने कामाला लागले. पोलिसांनी घटनास्थळ गाठत जमिनीत पेरून ठेवलेली दोन नग, जीवंत कुकर, दोन नग क्लेमवर माईन्स, एक नग पिस्तोल आणि दोन वायर बंडल जप्त केले. विशेष म्हणजे घटनास्थळीच बॉम्बशोधक पथकाच्या मदतीने स्फोट करून स्पोटके नष्ट करण्यात आली. पोलिसांनी वेळीच ही कारवाई केल्यामुळे माओवाद्यांचा मोठा हल्ल्याचा कट उधळला आहे.

पोलिसांनी संबंधित कारवाईबाबत प्रसिद्धीपत्रक जारी करत माहिती दिली आहे. नक्षलवादी शासनविरोधी विविध घातपाती हिंसक कारवाया करण्यासाठी प्रकारचे शस्त्र आणि स्फोटक साहित्याचा वापर करतात. ते साहित्य सुरक्षा दलांना धोका पोहचविण्याच्या उद्देशाने गोपनियरित्या जंगल परिसरात जमिनीमध्ये पुरुन ठेवतात, अशा पुरुन ठेवलेल्या साहित्यांच्या वापर नक्षलवाद्यांकडून नक्षल सप्ताह तसेच इतरप्रसंगी केला जातो.

(अंधश्रद्धेतून जोडप्याने घेतले 2 महिलांचे बळी; मग मांस कापून खाल्लं, देशाला हादरवणारी घटना)

उपविभाग कुरखेडा अंतर्गत येत असलेल्या पोमकें मालेवाडा हद्दीमध्ये मौजा लड्डुडेरा (हेटळकसा) जंगल परिसरात माओवाद्यांनी पोलीस पथकांना नुकसान पोहोचवण्यासाठी मोठा घातपाताचा डाव आखला होता. पण पोलिसांना 11 ऑक्टोबरला दुपारी दोन वाजेच्या सुमारास याबाबत माहिती मिळताच पोलीस तिथे घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घटनास्थळी तपास केला असता मोठ्या प्रमाणात दारूगोळा, स्फोटके व इतर साहित्य पुरून ठेवले असल्याचं निदर्शनास आले. विशेष अभियान पथक गडचिरोली आणि बीडीडीएस पथकाचे जवान नक्षलविरोधी अभियान राबवित असतांना एका संशयित ठिकाणी लपवून ठेवलेले स्फोटके आणि इतर साहित्य शोधून काढण्यात जवानांना यश आले.

पोलिसांना सापडलेल्या डंपमध्ये 2 नग जीवंत कुकर, 2 नग क्लेमोर, 1 नग पिस्टल, 2 नग वायर बंडल आणि पाणी साठवण्याचा 1 नग जर्मन गंज इत्यादी नक्षल साहित्य आढळले. घटनास्थळावर मिळालेल्या मुद्देमालावर कायदेशीर कारवाई करण्यात आली. यात स्फोटकांनी भरलेले 02 नग कुकर व 2 नग क्लेमोर हे बीडीडीएस पथकाच्या मदतीने अत्यंत सतर्कतेने जागेवरच नष्ट करण्यात आले. इतर साहित्य गडचिरोली येथे आणण्यात आलेले आहे. गडचिरोली पोलीस दलाकडून पुढील कारवाई सुरु आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

संबंधित कारवाई ही पोलीस अधीक्षक अंकित गोयल सा., अपर पोलीस अधीक्षक (अभियान) सोमय मुंडे सा., अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) श्री समीर शेख सा., अपर पोलीस अधीक्षक (अहेरी) अनुज तारे सा. यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. अभियानात सहभागी असलेल्या विशेष अभियान पथक गडचिरोली व बी.डी.डी.एस. पथकाच्या जवानांचे पोलीस अधीक्षक सा. यांनी कौतुक केले आहे. तसेच पोलिसांकडून जिल्ह्याभरात नक्षलविरोधी अभियान तीव्र करण्यात आल्याचे आदेश देण्यात आले आहेत. याशिवाय नक्षलवाद्यांनी नक्षलवादाची हिंसक वाट सोडून आत्मसमर्पण करुन सन्मानाने जीवन जगण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.

First published:
top videos

    Tags: Gadchiroli, Naxal Attack