मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /अंधश्रद्धेतून जोडप्याने घेतले 2 महिलांचे बळी; मग मांस कापून खाल्लं, देशाला हादरवणारी घटना

अंधश्रद्धेतून जोडप्याने घेतले 2 महिलांचे बळी; मग मांस कापून खाल्लं, देशाला हादरवणारी घटना

आरोपी दाम्प्त्य

आरोपी दाम्प्त्य

तपासादरम्यान आरोपींनी सांगितलं की, या जोडप्याला शफीने सांगितलं होतं की शिजवलेले मानवी शरीराचे अवयव खाल्ल्याने त्यांचे तारुण्य कायम राहण्यास मदत होईल.

  • Trending Desk
  • Last Updated :
  • Mumbai, India

    तिरुअनंतपुरम 12 ऑक्टोबर : केरळच्या एर्नाकुलम जिल्ह्यातील दोन बेपत्ता महिलांचे मृतदेह केरळ पोलिसांना सापडले आहेत. दोन्ही महिला उदरनिर्वाहासाठी लॉटरीची तिकिटं विकायच्या. या दोन महिलांमध्ये एक साम्य होतं, ते असं की बेपत्ता होईपर्यंत त्या कोचीमधील एका रेस्टॉरंटमध्ये एकत्र जात होत्या. इंडियन एक्स्प्रेसने दिलेल्या वृत्तानुसार, एक महिला रोजली (49) 6 जून रोजी बेपत्ता झाली होती आणि दुसरी महिला पद्मम (52) तीन महिन्यांनी 26 सप्टेंबर रोजी बेपत्ता झाली होती. केरळ पोलिसांनी दोन्ही महिलांच्या शरीराचे अवयव पथनमथिट्टा जिल्ह्यातील इलानथूर गावात पारंपरिक उपचार करणार्‍या व मसाजर असलेल्या व्यक्तीच्या घराच्या आवारातून जप्त केले. या प्रकरणी कोची शहर पोलिसांनी आतापर्यंत तीन जणांना अटक केली आहे.

    कोची शहराचे पोलीस आयुक्त सीएच नागराजू यांच्या मते, या दोन्ही बेपत्ता महिलांचा आर्थिक भरभराटीसाठी मानवी बळी देण्यात आला. हे काम यशस्वी करण्यासाठी महिलांचा छळ करून जीवे मारण्यात आलं. पोलिसांनी अटक केलेल्या तीन आरोपींमध्ये मसाजर भगवल सिंह, त्याची पत्नी लैला आणि कोची येथील रेस्टॉरंट मालक मोहम्मद शफी उर्फ रशीद यांचा समावेश आहे. आरोपींनी पीडितांना आमिष दाखवून आपल्या जाळ्यात ओढलं होतं.

    अंडा करीसाठी आईचा जीवच घेतला; आधी डोकं भिंतीवर आपटलं नंतर रॉडने संपवलं

    हा सर्व प्रकार नरबळी देण्याच्या हेतूने केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केलाय. शहर पोलिसांचं म्हणणं आहे, की महिलांचं शिर धडापासून वेगळं करण्यात आलं आणि नंतर त्यांचे मृतदेह पुरण्यात आले. श्रीमंत होण्याच्या हव्यासापोटी मसाजर आणि त्याच्या पत्नीने दोन्ही पीडितांचा खूप छळ केला आणि त्यानंतर त्यांचा बळी दिला. पोलीस आयुक्त म्हणाले, ‘सिंह दाम्पत्याचा आणि शफीचा जबाब नोंदवण्यात आला असून, त्यात त्यांनी महिलांना आमिष दाखवून फसवलं होतं असं कबुल केलंय. या संदर्भात शास्त्रीय पुरावे गोळा केले जात आहेत.’

    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पद्ममच्या कुटुंबीयांनी नोंदवलेल्या तक्रारीच्या आधारे बेपत्ता व्यक्तीचा पोलीस शोध घेत होते, त्यावेळी ही घटना उघडकीस आली. मूळची तमिळनाडूच्या धर्मापुरी येथील रहिवासी असलेली पद्मम कोच्चीमध्ये राहत होती. ती बेपत्ता झाल्यानंतर 27 सप्टेंबर रोजी तिच्या कुटुंबीयांनी बेपत्ता झाल्याची तक्रार पोलिसांत दाखल केली. तिचे संपूर्ण कॉल डिटेल रेकॉर्ड तपासले असता पद्मम शफीच्या संपर्कात असल्याचं आढळून आलं. तपासाअंती शफीवर या पूर्वीही अनेक गुन्हे दाखल असल्याचं समोर आलं. यामध्ये अंमली पदार्थ विक्रीपासून ते हल्ला आणि बलात्कार अशा गंभीर प्रकरणांचा समावेश आहे. कॉल डिटेल्समध्ये त्याचं नाव आल्यानंतर हा सर्व प्रकार समोर आला आणि शफीला ताब्यात घेण्यात आलं.

    या प्रकरणाचा खुलासा करताना पोलीस आयुक्तांनी सांगितलं की, या वर्षाच्या सुरुवातीला शफीने फेसबुक या सोशल मीडिया साइटवर 'श्रीदेवी'च्या नावाने एक फेक अकाउंट तयार केलं होतं, ज्यावर आर्थिक संपत्ती वाढवण्यासाठी पूजेची सेवा देणारी पोस्ट टाकण्यात आली होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शफीने या फेसबुक अकाउंटद्वारे सिंह याच्याशी संपर्क साधला आणि त्याला सांगितलं, की तो काळी जादू करणाऱ्या एका मांत्रिकाला ओळखतो. तो तुमची आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी उपाय सुचवू शकतो. यानंतर, तो स्वतःच काळी जादू करणाऱ्या मांत्रिकाच्या रुपात सिंहच्या घरी गेला होता.

    शफीने या जोडप्याला सांगितलं, की जर त्यांनी नरबळी देऊन पूजा केली तर ते श्रीमंत होऊ शकतात. बेपत्ता झालेल्या लॉटरी विक्रेत्या दोन्ही महिला शफीच्या रेस्टॉरंटमधील नियमित ग्राहक होत्या. त्यामुळे त्याने पहिली पीडिता रोजलीला फसवलं. शफीने रोजलीला एक अश्लील व्हिडिओ चित्रित करण्यासाठी 10 लाख रुपये देण्याचं वचन दिलं होतं, असं पोलिसांनी सांगितलं.

    औरंगाबादमध्ये विकृतीचा कळस, लुटमार करुन वृद्धेवर बलात्कार, नंतर पोलिसांवर हल्ला

    त्यानंतर रोजलीला सिंहच्या घरी नेण्यात आलं आणि तिथे तिचा छळ करण्यात आला. या प्रकरणाचा खुलासा करताना पोलिसांनी सांगितलं, की तिला एका कॉटला बांधलं होतं, तिचे स्तन कापले होते आणि तिचा शिरच्छेद करण्यात आला होता. इतकंच नाही तर‘मानवी बलिदान’ दिल्यानंतर पीडितेचं मांसही खाल्लं गेलं.नंतर आरोपींनी तिचा मृतदेह घराजवळील खड्ड्यात फेकून दिला. पहिल्या हत्येनंतर शफी नियमितपणे सिंहच्या घरी यायचा आणि कित्येक दिवस त्याच्यासोबत राहायचा, असा खुलासा पोलिसांनी केला.

    तपासादरम्यान आरोपींनी सांगितलं की, या जोडप्याला शफीने सांगितलं होतं की शिजवलेले मानवी शरीराचे अवयव खाल्ल्याने त्यांचे तारुण्य कायम राहण्यास मदत होईल. न्यूज 18 ला मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी लैलाने हत्येच्या तपशीलाची साक्ष दिली आहे ज्यामध्ये काळ्या जादूचा भाग म्हणून मानवी बळी दिल्यानंतर पीडितांचे मांस खाल्ले गेले. यावेळी पीडित रोझलीच्या बरगड्याचे मांस कापले गेले.

    पुढे शफीने या जोडप्याला आणखी एक नरबळी देण्यास तयार केलं. त्यासाठी त्यांनी पद्ममला निवडलं. तीही शफीच्या रेस्टॉरंटची नियमित ग्राहक होती. रोजलीप्रमाणेच तिलाही आमिष दाखवून भगवल सिंहच्या घरी नेण्यात आलं. तिचा अतोनात छळ करण्यात आला आणि शेवटी तिचा खून करण्यात आला. पोलिसांनी सांगितलं की, भगवल सिंह हा एलांथूर येथील पारंपरिक उपचार करणाऱ्या कुटुंबातील आहे. तो सोशल मीडियावरही सक्रिय आहे. तो त्याच्या फेसबूक पेजवर हायकू पोस्ट करायचा आणि हायकू कवितेचे वर्गही घ्यायचा.

    रोजली 6 जून रोजी बेपत्ता झाली होती. मात्र ती बेपत्ता झाल्याची तक्रार तिच्या मुलीच्या वतीने 17 ऑगस्ट रोजी पोलिसांना देण्यात आली. रोजलीची मुलगी उत्तर प्रदेशमध्ये शिक्षिका म्हणून काम करते आणि आईच्या शोधात ती केरळला पोहोचली होती.

    First published:

    Tags: Crime news, Murder