जाहिरात
मराठी बातम्या / क्राईम / Nanded Student Suicide : आदिवासी आश्रम शाळेतील 10 वर्षीय विद्यार्थीनीची आत्महत्या, नांदेड हादरलं

Nanded Student Suicide : आदिवासी आश्रम शाळेतील 10 वर्षीय विद्यार्थीनीची आत्महत्या, नांदेड हादरलं

Nanded Student Suicide : आदिवासी आश्रम शाळेतील 10 वर्षीय विद्यार्थीनीची आत्महत्या, नांदेड हादरलं

इयत्ता चौथीमध्ये शिकणाऱ्या अवघ्या 10 वर्ष वयाच्या मुलीने गळफास घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना नांदेड जिल्ह्यात घडली आहे

  • -MIN READ Nanded,Maharashtra
  • Last Updated :

मुजीब शेख (नांदेड), 13 डिसेंबर : इयत्ता चौथीमध्ये शिकणाऱ्या अवघ्या 10 वर्ष वयाच्या मुलीने गळफास घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना नांदेड जिल्ह्यात घडली आहे. आदिवासी आश्रम शाळेतील मुलींच्या वसतिगृहात हा प्रकार घडला आहे. विश्रांती देशमुखे ही हदगाव तालुक्यातील केदारगुढा येथील आदिवासी आश्रम शाळेत शिकत आहे. काल (दि.13) सायंकाळी 5 च्या सुमारास तिने वसतिगृहातील आपल्या दुमजली बेडच्यावरच्या लोखंडी रॉडला ओढणी बांधून आत्महत्या केली. तिने आत्महत्या का केली याचे कारण मात्र अद्याप समजू शकले नाही. अवघ्या 10 वर्षाच्या मुलीने अशाप्रकारे गळफास घेऊन आत्महत्या केल्याने मात्र खळबळ उडाली आहे.

जाहिरात

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आदिवासी आश्रम शाळेतील चौथीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीने गळफास घेत आत्महत्या केली. ही धक्कादायक घटना काल नांदेड जिल्ह्यातील हदगाव तालुक्यात केदारगुडा येथील शासकीय आदिवासी आश्रम शाळेत घडली. दरम्यान त्या मुलीने का आत्महत्या केली याबाबत कोणतीच माहिती समजू शकली नाही. या घटनेमुळे वसतिगृह परिसरातील विद्यार्थ्यांमध्ये खळबळ माजली आहे. ही विद्यार्थिनी आश्रमशाळेत शिकत होती. मात्र काल अचानक तिने आत्महत्या केली.

हे ही वाचा :  ..अन् जिवंत पत्नीच्या हत्येप्रकरणी त्याने 3 वर्ष तुरुंगवास भोगला; चक्रावून टाकणारं प्रकरण

मृत तरुणीच्या दोन बहिणी याच आश्रम शाळेत शिकण घेत आहेत. शाळेतून आश्रमाच्या खोलीत आले असताना खोलीचा दरवाजा बंद होता. आवाज देऊन ही तरुणी दरवाजा उघडत नसल्या ने व्यवस्थापनाने दरवाजा तोडणायचा निर्णय घेतला. दरवाजा तोडला असता तरुणीने पलंगला दोरी लावून गळफास घेतल्याचेही निदर्शनास आले.

जाहिरात

हे ही वाचा :  जेवणात केस निघाल्याने पतीचं राक्षसी कृत्य; पत्नीचे हातपाय बांधले अन् सगळ्यांसमोरच…

आत्महत्या नेमकी कोणत्या कारणासाठी केली या बाबत तर्कवितर्क लढविले जात आहे. घटनेची माहिती मिळताच गावातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. दरम्यान, या तरुणीच्या आत्महत्येस जबाबदार असणाऱ्या आरोपींविरोधात कारवाई करण्याची मागणी नातेवाईकांनी केली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलिसांकडून करण्यात येत आहे. दरम्यान, या घटनेमुळे नांदेडमध्ये नेमकं चाललंय काय असा प्रश्न उपस्थित होत आहे.

जाहिरात
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात