जाहिरात
मराठी बातम्या / क्राईम / जेवणात केस निघाल्याने पतीचं राक्षसी कृत्य; पत्नीचे हातपाय बांधले अन् सगळ्यांसमोरच...

जेवणात केस निघाल्याने पतीचं राक्षसी कृत्य; पत्नीचे हातपाय बांधले अन् सगळ्यांसमोरच...

फाईल फोटो

फाईल फोटो

पीडितेचं म्हणणं आहे, की तिचा पती जेवण करत होता. तेव्हा जेवणात केस निघाला. हे पाहून महिलेचा पती चांगलाच भडकला. मग त्याने…

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

लखनऊ 11 डिसेंबर : अनेकदा घरामध्ये किंवा बाहेर आपण जेवण करण्यासाठी जातो, तेव्हा आपल्याला जेवणाच्या ताटामध्ये केस दिसतो. खरं तर हे कोणालाच आवडत नाही. मात्र, एका व्यक्तीने जेवणात केस सापडल्याने आपल्या पत्नीसोबत असं काही केलं जे वाचून तुमच्या अंगावर काटा येईल. ही घटना उत्तर प्रदेशच्या पीलीभीतमधील आहे. यात पतीने छोट्या गोष्टीसाठी आपल्या पत्नीसोबत अतिशय धक्कादायक कृत्य केलं. एक्स-गर्लफ्रेंडच्या लग्नाबद्दल ऐकताच भडकला; तिच्या होणाऱ्या पतीला कोंडून घर पेटवलं अन्… पीडितेचं म्हणणं आहे, की तिचा पती जेवण करत होता. तेव्हा जेवणात केस निघाला. हे पाहून महिलेचा पती चांगलाच भडकला. महिलेनं पोलिसांत दिलेल्या तक्रारीत म्हटलं, की तिच्या पतीने तिला शिवीगाळ केली. तिचे हातपाय बांधून जबरदस्ती संबंध ठेवण्याचा प्रयत्न केला. इतकंच नाही तर याचा विरोध केल्याने तिचे केसच काढून टाकत टक्कल केला. महिलेचा आरोप आहे, की तिचा पती तिच्यासोबत हे सगळं करत असताना तिच्या सासूने आणि दिराने तिथेच उभा राहून हे सगळं फक्त बघत राहाण्याचं काम केलं. इतकंच नाही तर ते महिलेच्या पतीला आणखी भडकवत राहिले. महिलेचं म्हणण आहे, की तिने फोन करून माहेरकडच्या लोकांना या घटनेची माहिती दिली. मात्र, माहेरकडचे लोक घरी पोहोचताच पतीने त्यांनाही मारहाण करण्याचा प्रयत्न केला. आईला फोन केला म्हणून… बापाचं पोटच्या मुलीसोबत निर्दयी कृत्य, बीड हादरलं महिलेचा असाही आरोप आहे, की तिचा पती हुंड्याची मागणीही करतो आणि तिला मारहाणही करतो. पोलिसांनी महिलेच्या तक्रारीवरुन आरोपी पती, सासू आणि दिराविरोधात गुन्हा दाखल केला आहे. आरोपी पतीला पोलिसांनी अटक केली आहे. महिला आपल्या माहेरी गेली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात