जाहिरात
मराठी बातम्या / क्राईम / ..अन् जिवंत पत्नीच्या हत्येप्रकरणी त्याने 3 वर्ष तुरुंगवास भोगला; चक्रावून टाकणारं प्रकरण

..अन् जिवंत पत्नीच्या हत्येप्रकरणी त्याने 3 वर्ष तुरुंगवास भोगला; चक्रावून टाकणारं प्रकरण

..अन् जिवंत पत्नीच्या हत्येप्रकरणी त्याने 3 वर्ष तुरुंगवास भोगला; चक्रावून टाकणारं प्रकरण

सात वर्षांपूर्वी एका महिलेच्या हत्येप्रकरणी तिच्या पतीसह अन्य एकाला तुरुंगवास भोगावा लागला होता; मात्र जामिनावर बाहेर आल्यानंतर संबंधित आरोपीला त्याची पत्नी जिवंत आणि सुरक्षित सापडली

  • -MIN READ Trending Desk Rajasthan
  • Last Updated :

    जयपूर 12 डिसेंबर : एक चक्रावून टाकणारं प्रकरण राजस्थानमध्ये घडलं आहे. सात वर्षांपूर्वी एका महिलेची हत्या केल्याच्या आरोपाखाली दोन व्यक्तींना शिक्षा झाली होती; मात्र आता जिच्या हत्येच्या आरोपाखाली संबंधित दोन व्यक्ती शिक्षा भोगत होत्या, तीच महिला जिवंत असल्याचं समोर आल्यामुळे खळबळ उडाली आहे. ‘टीव्ही 9 हिंदी’ने याबाबतचं वृत्त दिलं आहे. राजस्थान राज्यात दौसामध्ये सात वर्षांपूर्वी एका महिलेच्या हत्येप्रकरणी तिच्या पतीसह अन्य एकाला तुरुंगवास भोगावा लागला होता; मात्र जामिनावर बाहेर आल्यानंतर संबंधित आरोपीला त्याची पत्नी जिवंत आणि सुरक्षित सापडली. अचानक बेपत्ता झालेली त्याची पत्नी दुसऱ्या व्यक्तीसोबत राहू लागली होती. तिच्या हत्येप्रकरणी सात वर्षांपूर्वी उत्तर प्रदेशात मथुरा येथे गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणी दोन जणांना अटक करण्यात आली होती; मात्र जिच्या हत्येच्या आरोपाखाली शिक्षा झाली होती, तिच जिवंत असल्याचं समोर आल्यानंतर उत्तर प्रदेश पोलिसांच्या कारवाईवर प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत. Shraddha Walker Murder Case : श्रद्धाच्या वडिलांचे आरोप, फडणवीसांचे चौकशीचे आदेश, आता मोठी अपडेट समोर दरम्यान, महिलेची ओळख पटल्यानंतर या संपूर्ण घटनेची माहिती मेहदीपूर बालाजी स्टेशन हाउस ऑफिसर अजित बडसारा यांना देण्यात आली. यानंतर पोलिसांनी संबंधित महिलेला बैजूपाडा परिसरातून ताब्यात घेतलं आणि उत्तर प्रदेशच्या वृंदावन पोलीस ठाण्यात याबाबत माहिती दिली. वृंदावन पोलिसांनी दौसा गाठून या प्रकरणाचा तपास केला असता संपूर्ण प्रकरण उघडकीस आलं. नेमकं काय आहे प्रकरण? मथुरेत कोसी येथे राहणारी आरती नावाची महिला सात वर्षांपूर्वी मेहदीपूर बालाजी येथे आली होती. ती छोटीमोठी कामं करून उदरनिर्वाह करू लागली. यादरम्यान तिची भेट सोनू सैनी नावाच्या तरुणाशी झाली. पुढे दोघांनी लग्न केलं. या लग्नानंतर काही दिवसांनी आरती बेपत्ता झाली होती. दुसरीकडे, वृंदावनमध्ये काही दिवसांनंतर पोलिसांना कालव्यात एका महिलेचा मृतदेह सापडला. या मृतदेहाची लगेच ओळख पटू शकली नाही; मात्र नंतर आरतीच्या वडिलांनी पोलीस ठाण्यात ठेवलेले फोटो आणि कपड्यांवरून संबंधित मृतदेह आरतीचा असल्याचं सांगितलं होतं. जेवणात केस निघाल्याने पतीचं राक्षसी कृत्य; पत्नीचे हातपाय बांधले अन् सगळ्यांसमोरच… यानंतर पोलिसांनी आरतीच्या वडिलांच्या तक्रारीवरून 2015 मध्ये दौसा येथील रहिवासी असणारा आरतीचा पती सोनू सैनी आणि त्याचा साथीदार गोपाल सैनी यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली होती. या दोन्ही आरोपींनी गुन्हा केला नसल्याचं वारंवार सांगितलं; मात्र पोलिसांनी त्यांचं ऐकलं नाही. अखेर तीन वर्षं तुरुंगात राहिल्यानंतर दोघेही जामिनावर बाहेर आले. यानंतर आरती ही महिला दौसामधल्या विशाला गावात सापडली. या प्रकारानंतर उत्तर प्रदेश पोलिसांच्या कारवाईबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येऊ लागलं आहे. गुन्हा न करताही दोन व्यक्तींना शिक्षा भोगावी लागल्याने उत्तर प्रदेश पोलिसांच्या कामकाजावर टीका होत आहे.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात