सावनेर, 3 जुलै : नागपूरातील (Nagpur News) सावनेर या परिसरात रविवारी सायंकाळी एक विचित्र घटना उघडकीस आली. सावनेर बस स्टॉपच्या मागील केशव लॉजमध्ये एक 27 वर्षीय युवकाचा त्याच्या प्रेयसीसोबत संभोग करताना मृत्यू झाल्याचा (Crime News) धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मृत व्यक्ती ही कळमेश्वर ताल्युक्यातील धापेवाडा या गावातील निवासी असून खासगी चार चाकी गाडी चालविण्याचे काम करत होती. त्याची 21 वर्षीय प्रेयसी नर्स असून पांढुरणा मध्यप्रदेश येथील राहणारी आहे.
त्या मृतक युवकाचे नाव अजय जंगलूजी परतेकी असे आहे. त्याने संभोग करण्यापूर्वी उत्तेजित करणाऱ्या पदार्थांचं सेवन केलं होतं, असा अंदाज वर्तविण्यात येत आहे. संभोग करतानाच तो बेशुद्ध पडल्याची माहिती प्रेयसीने प्रियकराच्या धापेवडा येथील मित्राला दिली. तो मित्र धापेवाडा येथून झायलो गाडीने सावणेरच्या केशव लॉज येथे आला. यानंतर अजयला सावणेरच्या डॉक्टर भगतकडे नेण्यात आले. तोवर अजय जिवंत होता अशी माहिती अजयच्या मित्रांनी सांगितली.
डॉक्टर भगत यांच्या सांगण्यानुसार, अजयला सावनेर ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आलं. येथे डॉक्टर मयूर डोंगरे यांनी त्याला मृत घोषित केले. अजयच्या खिशातून उत्तेजित करणारी औषधं मिळाल्याची माहिती सूत्रानुसार प्राप्त झालेली आहे. या घटनेची माहिती डॉक्टरांकडून पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी विचारपूस करण्यासाठी पांढुरणा मध्यप्रदेश येथे राहणाऱ्या त्याच्या प्रेयसीला ताब्यात घेतले आहे.
अजय याचे त्याच्या प्रेयसी सोबत गेल्या 3 वर्षांपासून प्रेम संबंध होते. येत्या 2 महिन्यात दोघेही लग्न करणार होते. अजयची 21 वर्षीय प्रेयसी नर्स आहे. अजय रविवारी सकाळी पांढुरणा येथे गेला आणि दुपारी 3 वाजता प्रेयसीला सोबत घेऊन सावणेरच्या केशव लॉजमध्ये घेऊन गेला. प्रेयसीसोबत सेक्स करताना त्याने वाढवण्यासाठी संभोगासाठी उत्तेजित करणाऱ्या गोळ्या घेतल्या होत्या. संभोग करीत असताना तो खाली पडून बेशुद्ध झाला. सावनेर पोलिसांनी प्रियसीचा जबाब नोंदवला असून पुढील तपास सुरू आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.