Home /News /crime /

स्वतःच्या GF चा हात पकडणंही तरुणाला पडलं महागात; 8 वर्षांनंतरही मुंबईतील कोर्टाने ठोठावली मोठी शिक्षा

स्वतःच्या GF चा हात पकडणंही तरुणाला पडलं महागात; 8 वर्षांनंतरही मुंबईतील कोर्टाने ठोठावली मोठी शिक्षा

गर्लफ्रेंडचा हात धरल्याने आठ वर्षांपूर्वी तरुणाला अटक करण्यात आली होती आणि त्यानंतर त्याला जामीनावर सोडण्यात आलं होतं.

    मुंबई, 17 जून : नवरा-बायको असो किंवा गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड (Girlfriend boyfriend news) कपलमध्ये काही ना काही कारणावरून वाद, भांडणं होतच असतात. पण आपल्याला छोटी-छोटी वाटणारी ही भांडणं वाद, किंवा त्यावेळी रागात नकळतपणे घडलेलं साधं कृत्यही किती महागात पडू शकतं, हे एका तरुणाला चांगलंच समजलं आहे. मुंबईत एका तरुणाला गर्लफ्रेंडचा हात पकडणंही भारी पडलं आहे. तब्बल 8 वर्षांनंतरही कोर्टाने त्याला शिक्षा ठोठावली आहे (Jail to man for holding hand of girlfriend). 20 सप्टेंबर 2014 साली एका तरुणीने आपल्या तरुणाविरोधात पोलिसात तक्रार दिली होती. दोघंही एकमेकांचे शेजारी होते. जिन्यावर त्याने आपला हात धरून स्वतःकडे खेचल्याचा आरोप तिने लावला. या प्रकरणात एफआयआरही नोंदवण्यात आला होता.  त्यानंतर तरुणाला अटक करण्यात आली होती आणि त्यानंतर त्याला जामीनावर सोडण्यात आलं होतं. या घटनेला 8 वर्षे उलटली. त्यानंतरही कोर्टाने याप्रकरणी सुनावणी करत आपला निकाल दिला आहे. त्याला एक वर्षाच्या तुरुंगवासासह पाच हजार रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला आहे. ही घटना 2014 सालातील आहे. त्याला बरीच वर्षे झाली आहेत. आता आपलं लग्न आता दुसऱ्या महिलेशी झालं आहे आणि आपल्याला दोन वर्षांचा एक मुलगाही आहे. त्यामुळे या प्रकरणात आपली सुटका करावी, अशी मागणी या तरुणाने केली. पण कोर्टाने त्याचं काहीच ऐकलं नाही. हे प्रकरण महिलेच्या अब्रूशी संबंधित असल्याचं सांगत त्याच्या सुटकेला कोर्टाने स्पष्टपणे नकार दिला. हे वाचा - लग्नाच्या आनंदात भररस्त्यातच तरुणाचं संतापजनक कृत्य; VIDEO पाहून भडकले नेटिझन्स लाइव्ह हिंदुस्थानने टाइम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्टचा हवाला देत दिलेल्या वृत्तानुसार मेट्रोपॉलिटन मॅजिस्ट्रेट क्रांती एम पिंगळे यांनी या प्रकरणाची सुनावणी करताना सांगितलं की, प्रोबेशन ऑफ ऑफेंडर एक्ट अंतर्गत चांगला व्यवहार केल्याच्या आधारावरही सोडण्यास नकार दिला न्यायाधीशांनी हायकोर्टाच्या एका निर्णयाचा हवाला देत सांगितलं की, असा गुन्हा करणाऱ्यांना प्रोबेशनवर सोडू नये कारण प्रकरण एका महिलेच्या अब्रूशी संबंधित आहे.  तरुणाने असं केल्यानंतर त्याला सोडणं म्हणजे अशा गुन्हेगारीला प्रोत्साहन मिळेल. तसंच असे गुन्हे रोखणं आणि गुन्हेगारांना पकडणं अशक्य होईल. ज्यामुळे महिलांविरोधात इतर गुन्हे रोखणंही अशक्य होईल. हे वाचा - प्रेमात आयुष्यभराची जखम! बायकोने मित्राला घरी बोलावलं; नवऱ्याने कापला त्याचा प्रायव्हेट पार्ट तरुणाने सांगितल्यानुसार त्याची सद्यपरिस्थिती पाहता त्याची शिक्षा कमी होऊ शकते. पण ज्याने जो गुन्हा केला आहे, ज्याची शिक्षा द्यावीच लागेल, असं कोर्टाने स्पष्टपणे सांगितलं.  या प्रकरणात तरुणीचे वडील आणि काका साक्षीदार होते.
    Published by:Priya Lad
    First published:

    Tags: Couple, Crime, Lifestyle, Relationship

    पुढील बातम्या