मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /

माझी बायको होशील का? 13 वर्षीय मुलीसाठी मुलाचं इन्स्टा स्टेटस; पुण्यातील प्रकार

माझी बायको होशील का? 13 वर्षीय मुलीसाठी मुलाचं इन्स्टा स्टेटस; पुण्यातील प्रकार

13 वर्षीय मुलीसाठी मुलाचं इन्स्टा स्टेटस

13 वर्षीय मुलीसाठी मुलाचं इन्स्टा स्टेटस

पुण्यातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणात हडपसर पोलिसांनी आरोपी विद्यार्थ्यावर पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Rahul Punde

पुणे, 23 नोव्हेबंर : सोशल मीडियाच्या माध्यमातून गुन्हेगारीचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. प्रौढांपर्यंत मर्यादीत असलेली सोशल मीडिया अल्पवयीन मुलांच्या हाती लागल्याने तेही यात ओढले जात असल्याचे समोर आले आहे. पुण्यातील एका प्रकरणाने पोलिसांसह पालकांच्याही चिंता वाढवण्याचं काम केलं आहे. शहरातील एका 14 वर्षाच्या शाळकरी पोराने स्वतःच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर आपल्याच शाळेतील एका 13 वर्षीय मुलीचा फोटो ठेऊन बायको होशील का? असे स्टेटस ठेवले.

पुण्यातील एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणात हडपसर पोलिसांनी आरोपी विद्यार्थ्यावर पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पीडित मुलीच्या कुटुंबीयांनी केलेल्या तक्रारीनंतर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात आता पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

या प्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, यातील मुलगी आणि मुलगा हडपसर परिसरातील एका नामांकित शाळेत शिक्षण घेतात. दोघेही हडपसर परिसरात राहतात अनेकदा हा मुलगा माझा पाठलाग कारयाचा. माझ्यासोबत मैत्री कर अन्यथा तुला उचलून घेऊन जाईल, अशी धमकीही वारंवार देत होता, असं तक्रारीत म्हटलं आहे. परंतु, याकडे मुलीने दुर्लक्ष केलं. मुलगी दुर्लक्ष करते हे पाहून आरोपी मुलाने तिचा फोटो काढून माझी बायको होशील का? असं स्टेटस इंस्टाग्राम अकाउंटवर ठेवलं होतं. त्यानंतर मुलीने हा सर्व प्रकार आईला सांगितला. आईने याप्रकरणी हडपसर पोलीस स्टेशन गाठून तक्रार दिली. अधिक तपास पोलीस करत आहेत.

वाचा - पुणे : प्रेयसी दुर्लक्ष करत असल्याने भडकला; प्रियकराने गाठला क्रूरतेचा कळस

अल्पवयीन मुलांच्या हाती मोबाईल

कोरोना संसर्गामुळे शाळेपासून महाविद्यालयापर्यंत सर्व गोष्टी ऑनलाईन झाल्या. परिणामी मोठ्यांसोबत लहान मुलांकडेही मोबाईल आला. लहान मुलांना मोबाईलचं एक प्रकारे व्यसन लागल्याचेही तज्ज्ञांचे म्हणणे आहे. अल्पवयीन मुलंही सोशल मीडिया अकाउंट वापरताना दिसत आहे. अनेकदा पालकांकडून याकडे दुर्लक्ष केलं जातं. यामुळे असे प्रकार होत असल्याचंही बोललं जात आहे. बऱ्याच घरात लहान मुलांना सेपरेट मोबाईल असल्याचंही लक्षात येते. तज्ज्ञांनुसार लहान मुलांच्या हातात मोबाईल देणे त्यांच्या भविष्याच्या दृष्टीने धोकादायक आहे.

First published:

Tags: Crime, Pune