मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /

तुरुंगात गँगवॉर, मुख्तार अन्सारींच्या निकटवर्तीयांसह दोन गुंडांची हत्या, गोळीबार करणाराही चकमकीत ठार

तुरुंगात गँगवॉर, मुख्तार अन्सारींच्या निकटवर्तीयांसह दोन गुंडांची हत्या, गोळीबार करणाराही चकमकीत ठार

firing in chitrakoot jail काही दिवसांपूर्वी सुल्तानपूर तुरुंगातून चित्रकूट येथील तुरुंगात अंशु दीक्षित याला हलवण्यात आले होते. दीक्षित पूर्वांचलमधील कुख्यात गँगस्टर आहे. त्यानं चित्रकूट तुरुंगामध्ये असलेल्या मुकीम काला आणि मेराज या दोन गँगस्टरची हत्या केली आहे.

पुढे वाचा ...
  • Published by:  News18 Desk

लखनऊ, 14 मे : उत्तर प्रदेशच्या (UP) चित्रकूट तुरुंगामध्ये (Chitrakoot Jail) दोन गटांकडून एकमेकांवर गोळीबार झाला (Firing) आहे. या घटनेत दोघांचा मृत्यू झाला आहे. तुरुंगात असलेल्या दोन कैद्यांची (Gangster) यात हत्या झाली. मारला गेलेला एक गुंड बाहुबली आमदार मुख्तार अन्सारी (Mukhtar Ansari) यांचा निकटवर्तीय असल्याची माहिती आहे. तर हत्या करणाऱ्या गँगस्टरला पोलिसांनी एन्काऊंटरमध्ये (Police Encounter) ठार केलं. या प्रकरणानंतर एकच खळबळ माजली असून प्रमुख अधिकारी घटनास्थळी दाखल झाले.

(वाचा-समारंभात महिलेचं मुलासोबत विचित्र कृत्य, Video Viral होताच सोशल मीडियावर ट्रोल)

या घटनेसंदर्भात समोर आलेल्या माहितीनुसार काही दिवसांपूर्वी सुल्तानपूर तुरुंगातून चित्रकूट येथील तुरुंगात अंशु दीक्षित याला हलवण्यात आले होते. दीक्षित पूर्वांचलमधील कुख्यात गँगस्टर आहे. त्यानं चित्रकूट तुरुंगामध्ये असलेल्या मुकीम काला आणि मेराज या दोन गँगस्टरची हत्या केली आहे. यापैकी मुकीम काला याच्यावर सरकारनं बक्षीस जाहीर केलेलं होतं, तर मेराज हा बाहुबली नेता आमदार मुख्तार अन्सारीचा नीकटवर्तीय असल्याची माहिती आहे.

तुरुंगामध्ये फायरिंग झाल्यानंतर प्रशासनाच्या प्रुमुख अधिकाऱ्यांसह पोलिसांचं पथक घटनास्थळी पोहोचलं. त्यानंतर अंशु दीक्षित आणि पोलिसांच्या पथकामध्येही गोळीबार झाला. त्यात अंशु दीक्षित ठार झाला. अंशु दीक्षितने या दोघांची हत्या केल्यानंतर तुरुंगातील आणखी पाच कैद्यांनाही बंदी बनवलं होतं. पोलिसांनी त्याला कैद्यांना सोडण्यास सांगितलं, पण त्याने ऐकलं नाही, त्यामुळं चकमकीत त्याचा मृत्यू झाला.

(वाचा-विधवा महिलेवर अत्याचार करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याला गावकऱ्यांनी शिकवला धडा..!)

या घटनेनंतर तुरुंगामध्ये सध्या तपास मोहीम राबवली जात आहे. या संपूर्ण घटनेमध्ये मृत्यू झालेले तिन्ही गुन्हेगार हे कुख्यात गँगस्टर होते. या गुन्हेगारांचं आपसांतही शत्रूत्व होतं, त्यातूनच हा प्रकार घडल्याची माहिती आहे. पण तुरुंगामध्ये अशी घटना घडत असेल तर शस्त्र आणि इतर साहित्य गुंडांपर्यंत कसं पोहोचलं याचा सध्या शोध घेतला जात असून पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

First published:

Tags: Gangster, Up crime news