मराठी बातम्या /बातम्या /देश /

विधवा महिलेवर अत्याचार करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याला गावकऱ्यांनी शिकवला धडा..!

विधवा महिलेवर अत्याचार करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याला गावकऱ्यांनी शिकवला धडा..!

विधवा महिलेवर अत्याचार करण्याच्या तयारी असलेल्या या नराधम पोलीस अधिकाऱ्याला गावकऱ्यांनी रंगेहाथ पकडलं आणि पोलिसांच्या स्वाधीन केलं. पोलीस विभागाने तातडीने कारवाई करत गुरविंदरसिंगला नोकरीवरून काढून टाकले आहे.

  • Published by:  News18 Desk

नवी दिल्ली, 13 मे : एकीकडे कोरोना महामारीनं लोक हैरान असताना पंजाबच्या (Punjab Crime) एका सहायक पोलीस उपनिरीक्षकानं विधवा महिलेवर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. विझ बठिंडाच्या सीआयए स्टाफमध्ये तैनात असिस्टंट पोलीस इन्स्पेक्टर (Punjab Police) गुरविंदरसिंगचे अत्याचार जास्तच वाढल्यानं गावकऱ्यांनी त्याला चांगलाच धडा शिकवला आणि पोलिसांच्या स्वाधीन केला.

विधवा महिलेवर अत्याचार करण्याच्या तयारी असलेल्या या नराधम पोलीस अधिकाऱ्याला गावकऱ्यांनी रंगेहाथ पकडलं आणि पोलिसांच्या ताब्यात दिलं. पोलीस विभागानं तातडीनं कारवाई करत गुरविंदरसिंगला नोकरीवरून काढून टाकले आहे. पोलीस कोठडीत त्याने आत्महत्या करण्याचा प्रयत्नही केल्याचं सांगण्यात येत आहे.

गुरविंदरसिंगने अफूच्या तस्करीचा खोटा गुन्हा दाखल करून विधवेच्या 20 वर्षाच्या मुलाला अटक केली होती. विशेष म्हणजे कोरोनाची लक्षणे जाणवत असल्यानं या महिलेचा मुलगा घरात क्वारंटाईन असताना त्याला पोलीस घेऊन गेले होते. मुलगा सोडण्याच्या बदल्यात आरोपी गुरविंदरसिंगने विधवा महिलेकडे दोन लाख रुपयांची मागणी केली. एकदा तर गुरविंदरने त्या महिलेच्या थेट घरी जावून मुलाच्या उपचारासाठी आईने जमा केलेले 60,000 रुपये काढून घेतले.  मुलाची सुटका करायची असल्यास दोन लाख रुपयांची व्यवस्था करण्यास सांगितले. पीडित महिलेनं कसं-बसं नातेवाईकांकडून एक लाख रुपयांची जुळवाजुळव करून गुरविंदरसिंगला दिलं. मात्र, तरीही त्यानं मुलाला सोडलं तर नाहीच आणि त्यानंतर महिलेकडं शारीरिक संबंध ठेवण्याची मागणी करण्यास सुरुवात केली.

हे वाचा - डिसेंबरपर्यंत संपूर्ण देशाला मिळणार कोरोना लशीचं कवच; मोदी सरकारने तयार केला हा प्लॅन

जेव्हा पाणी फारच डोक्यावरुन जावू लागलं तेव्हा महिलेनं गावकऱ्यांना मदत मागितली. महिलेनं हा संपूर्ण प्रकार गावकऱ्यांना सांगितला, तेव्हा आरोपी गुरविंदरसिंगला रंगेहाथ पकडण्याचे सर्वांनी मिळून नियोजन केलं. पोलिसाचा पर्दाफाश करता यावा यासाठी सरपंचांनी महिलेच्या घरात छुपा कॅमेरा बसवला. मंगळवारी ठरवलेल्या योजनेनुसार महिलेनं आरोपी गुरविंदरसिंगला रात्री आठ वाजण्याच्या सुमारास घरी येण्यास सांगितलं, त्यानंतर तो घरी आला आणि आपले कपडे काढून महिलेशी संबंध प्रस्थापित करण्याच्या प्रयत्नात असताना अचानक गावकऱ्यांनी दार उघडून रंगेहाथ पकडलं.

First published:

Tags: Crime news, Punjab