समारंभात महिलेचं मुलासोबत विचित्र कृत्य, IPS अधिकाऱ्यानं Video शेअर करत उपस्थित केला सवाल

समारंभात महिलेचं मुलासोबत विचित्र कृत्य, IPS अधिकाऱ्यानं Video शेअर करत उपस्थित केला सवाल

एका समारंभात अनेक लोकांसमोर एक महिला (Woman) लहान मुलासोबत विचित्र कृत्य करत आहे. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर संबंधित महिलेला मोठ्या प्रमाणात ट्रोल (Troll) केलं गेलं आहे.

  • Share this:

नवी दिल्ली 14 मे : सध्या एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल (Viral on Social Media) झाला आहे. यामध्ये एका समारंभात अनेक लोकांसमोर एक महिला (Woman) लहान मुलासोबत विचित्र कृत्य करत आहे. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर संबंधित महिलेला मोठ्या प्रमाणात ट्रोल (Troll) केलं गेलं आहे. इतकंच नाही तर महिलेविरोधात कारवाई करण्याची मागणीही केली जात आहे. आयपीएस अधिकाशी दिपांशू काबरा (Dipanshu Kabra) यांनीही हा व्हिडिओ (Video) शेअर करत महिलेच्या या वागणुकीबाबत नाराजी व्यक्त केली आहे. ते म्हणाले, की अशात लहान मुलं महिलांचा आदर करणं कसं शिकतील?

कोरोनासोबतचा लढा ठरला अपयशी; 'लव्ह यू जिंदगी' गाण्यावर थिरकणाऱ्या तरुणीचा मृत्यू

हा व्हिडिओ एक समारंभातील आहे. व्हिडिओमध्ये महिला या लहान मुलाच्या ओठांवर किस करते आणि त्याच्यासोबत विचित्र कृत्य करण्याचा प्रयत्न करते. इतकंच नाही तर यादरम्यान तो लहान मुलगा जमिनीवर कोसळतो, मात्र तरीही ती त्याला सोडत नाही. या व्हिडिओवर प्रतिक्रिया देत काबरा म्हणाले, की यात केवळ ही महिलाच नाही तर संबंधित मुलाचे पालक आणि या गोष्टीसाठी तिला प्रोत्साहन देणारा प्रत्येक व्यक्ती जबाबदार आहे. लहान मुलांना हे सगळं शिकवलं गेलं, तर ते महिलांचा आदर करणं कसं शिकतील?

अवैध मसाज पार्लरवर पोलिसांची छापेमारी; शेवटी कमिशनरला पकडून आणलं बाहेर

कारवाईची मागणी -

हा व्हिडिओ सायकॉलिजी आणि पुरुषांच्या अधिकारासाठी काम करणाऱ्या बिजय सिंह यांनी ट्विटरवर शेअर केला आहे. त्यांनी म्हटलं, की हीच घटना उलटी घडली असती तर काय झालं असतं? ट्विटमध्ये ते म्हणाले, हेच प्रकरण जर उलटं असतं आणि हे कृत्य महिलेसोबत घडलं असतं तर...मात्र असं झालं नाही हे बरं झालं. कोणी आहे का, जो या महिलेविरोधात कारवाई करेल? मला माहिती आहे, तिच्याविरोधात कोणीच आवाज उठवणार नाही. हा वेडेपणा आहे, असंही त्यांनी पुढे म्हटलं आहे.

Published by: Kiran Pharate
First published: May 14, 2021, 11:42 AM IST

ताज्या बातम्या