Home /News /crime /

भाच्याचा मामीवर जडला जीव, प्रेमाच्या धुंदीत असा काढला मामाचा काटा; 9 महिन्यांनंतर आलं समोर

भाच्याचा मामीवर जडला जीव, प्रेमाच्या धुंदीत असा काढला मामाचा काटा; 9 महिन्यांनंतर आलं समोर

सख्ख्या मामीवर भाच्याने (Love with Maternal Aunty) डोळा ठेवला होता. प्रेमाचा मार्ग मोकळण्यासाठी या भाच्याने थेट मामाचाच खून (Murder of Mother's Brother) केल्याची धक्कादायक घटना तब्बल नऊ महिन्यांनी समोर आली आहे.

  बीड, 20 मे : प्रेमाच्या धुंदीत असल्यावर व्यक्ती काहीही चुकीचं पाऊल उचलू शकतो, याचा प्रत्यय देणारी घटना समोर आली आहे. सख्ख्या मामीवर भाच्याने (Love with Maternal Aunty) डोळा ठेवला होता. प्रेमाचा मार्ग मोकळण्यासाठी या भाच्याने थेट मामाचाच खून (Murder of Mother's Brother) केल्याची धक्कादायक घटना तब्बल नऊ महिन्यांनी समोर आली आहे. डिंगाबर हरिभाऊ गाडेकर (वय 35, रा. बाभळगाव, ता. माजलगाव), असे मृताचे नाव आहे. नेमके काय आहे प्रकरण - डिगांबर हरिभाऊ गाडेकर हे माजलगावच्या संजय गांधी निराधार योजनेच्या तालुका समितीचे सदस्य होते. त्यांच्या पत्नीवर त्यांच्याच भाच्याने डोळा ठेवला होता. त्याने आपला प्रेमाचा मार्ग मोकळा करण्यासाठी दोन जणांची मदत घेतली आणि थेट मामालाच संपवले. त्याने आपल्या मामाची सिनेस्टाईल हत्या केली. सुरुवातीला त्याने रिधोरी येथे बंधाऱ्याजवळ मामाच्या शरीराचे दोन तुकडे केले. यानंतर ते तुकडे एका पोत्यात भरले आणि विहिरीत फेकले. तब्बल नऊ महिन्यांनी घटना उजेडात - मृत डिगांबर हे 30 सप्टेंबर 2021 रोजी घरातून बेपत्ता झाले होते. तर तेच दुसरीकडे 11 मे 2022 यादिवशी वारोळा शिवारातील एका विहिरीत मृतदेहाचा कमरेखालील भाग आढळला. तर तीन दिवसांनी विहिरीच्या तळाला शिर आणि धड असलेला शरीराचा भागही आढळून आला. या घटनेने एकच खळबळ उडाली होती. तर या मृतदेहाची तपासणी केली असता पँटच्या खिशात काही महिलांचे पासपोर्ट फोटो आढळले. डिगांबर हरिभाऊ गाडेकर हे माजलगावच्या संजय गांधी निराधार योजनेच्या तालुका समितीचे सदस्य होते. या माध्यमातून ते महिलांना निराधार योजनेचा लाभ मिळवून देत. म्हणून हा मृतदेह त्यांचा असावा, असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला. हेही वाचा - पत्नीला 'त्या' अवस्थेत पाहून पतीला बसला धक्का; गळफास घेऊन संपवलं जीवन
  पोलिसांनी आरोपी भाचाला केली अटक - 
  या आधारावर पोलिसांनी संबंधित महिलांची ओळख पटवली. तसेच त्यांची विचारपूसही केली. यानंतर त्या महिलांनी नऊ महिन्यांपूर्वी डिगांबर यांना निराधार योजनेच्या लाभासाठी फोटो दिल्याचे सांगितले. इतकेच नव्हे तर ओळख म्हणून डिगांबर यांच्या डोक्याला छिद्र होते, याबाबतची माहिती त्यांचे बंधू नारायण यांनी दिली. या माहितीच्या आधारे हा मृतदेह डिगांबर असल्याचे स्पष्ट झाले. ही धक्कादायक घटना तब्बल नऊ महिन्यांनी समोर आला. याप्रकरणी पोलिसांनी भाचा, पुतण्यासह, अन्य एकाला अटक केली आहे. याप्रकरणी पुढील तपास सुरू आहे.
  Published by:News18 Desk
  First published:

  Tags: Beed news, Murder, Police

  पुढील बातम्या