कानपूर, 22 नोव्हेंबर : हे अत्यंत दुर्देवी (Shocking News) आहे. लहानग्या मुलाच्या दुसऱ्या जन्मदिवशी आई आंचलवर अंत्यसंस्कार करण्यात आले. आंचलचा मृतदेह काकादेव स्थित तिच्या माहेराहून सकाळी साधारण 10.30 वाजता भैरव घाट येथे घेऊन जाण्यात आलं. घाटावर भाऊ अक्षयने आपल्या बहिणीवर अंत्यसंस्कार केले. (Crime News)
अक्षयने सांगितलं की, कुटुंबीयांची इच्छा होती, आंचलला तिचा मुलगा अयांश मुखाग्नि देईल, मात्र गर्दीमुळे असं करता आलं नाही. रविवारी जेव्हा अयांशने डोळे उघडले तर भिंतीवर आपली आई आंचलचे मोठ मोठे फोटो पाहून त्या दिशेने हात करून रडू लागला. आजी रीनाने सांगितलं की, अयांशला उचलून घेतलं तर फोटोंकडे पाहून अयांश रडू लागला.
अयांशचा वाढदिवस केला नाही साजरा..
अक्षयने सांगितलं की, आंचल आपला मुलगा अयांशचा वाढदिवश अत्यंत आनंदात करणार होती. यासाठी तिने पार्टी देण्याचंही सांगितलं होतं. याबाबत ती सूर्यांशदेखील बोलली होती. मात्र सूर्यांशने तिचं ऐकलं नाही. आरोप आहे की, पती सूर्यांश आंचलवर मानसिक अत्याचार करीत होता. याशिवाय सूर्यांश हा अयांशला मारहाण करीत होता. रविवारी अयांशचा दुसरा वाढदिवस होता. मात्र केकच्या मेणबत्ती पेटवण्याऐवजी त्याला आईची चिता जाळावी लागली, असं म्हणत अक्षय ढसाढसा रडू लागला.
अयांशचा जीव धोक्यात, कुटुंब दहशतीत...
आंचलचे वडील पवन ग्रोवरने सांगितलं की, सूर्यांश आणि निशा (तरुणीची सासू) मोठे लोक आहेत. माझ्या मुलीला संपत्तीतून बाहेर काढण्यासाठी त्यांनी तिची हत्या केली. ते पुढे म्हणाले की, अयांश सूर्यांशचा एकमेव वारस आहे. अशात त्याच्या जीवाला धोका आहे. संपूर्ण कुटुंबीय दहशतीत असून या प्रकरणात त्यांनी सुरक्षेची मागणी केली आहे.
आंचलचा मृतदेह माहेरच्या अंगणातून उठताच तिची आई रडू लागली. तिला पतीला सोडायचं नव्हतं. मात्र तिला खूप त्रास दिला जात होता. सर्वांनी मिळून माझ्या मुलीचा जीव घेतल्याचही त्या यावेळी म्हणाल्या.
कानपूरमधील अशोक नगरमध्ये शुक्रवारी रात्री उशिरा एका मसाला व्यावसायिकाच्या पत्नीची संशयास्पद अवस्थेत मृत्यू झाला. बाथरूममध्ये गळफास घेतलेल्या अवस्थेत तिचा मृतदेह दिसला. मृतदेह पाहून पती आणि सासू फरार झाल्या होत्या, जेव्हा याबद्दल मुलीच्या माहेरच्यांना कळालं, त्यानंतर याबद्दल खुलासा झाला. कुटुंबीयांनी आंचलच्या हत्येमागे तिचा पती आणि सासू जबाबदार असल्याचा आरोप केला आहे. याप्रकरणात त्यांनी पोलिसात गुन्हाही दाखल केला आहे.
हे ही वाचा-सुनेचा हुंडाबळी घेऊन झाले होते फरार, पोलिसांनी आई आणि मुलाला ठोकल्या बेड्या
काय आहे प्रकरण?
उत्तर प्रदेशातील कानपूरमध्ये आंचल नावाच्या तरुणीचा मृत्यू झाला होता. आपल्या मुलीची हत्या करण्यात आल्याचा आरोप तिच्या आईवडिलांनी केला होता. आंचलला अगोदर ठार मारण्यात आलं आणि नंतर तिने आत्महत्या केल्याचा बनाव रचत तिचा मृतदेह लटकवण्यात आल्याचा आरोप तिच्या आईवडिलांनी केला होता. पोलीस या प्रकरणी पुरावे गोळा करण्याचा प्रयत्न करत होते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Birthday celebration, Crime news, Mother, Murder