मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /

सुनेचा हुंडाबळी घेऊन झाले होते फरार, पोलिसांनी आई आणि मुलाला ठोकल्या बेड्या

सुनेचा हुंडाबळी घेऊन झाले होते फरार, पोलिसांनी आई आणि मुलाला ठोकल्या बेड्या

सुनेची हत्या करून फरार (Police arrested absconding mother and son in dowry and murder case) झालेल्या सासू आणि पतीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

सुनेची हत्या करून फरार (Police arrested absconding mother and son in dowry and murder case) झालेल्या सासू आणि पतीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

सुनेची हत्या करून फरार (Police arrested absconding mother and son in dowry and murder case) झालेल्या सासू आणि पतीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

  • Published by:  desk news

कानपूर, 21 नोव्हेंबर: सुनेची हत्या करून फरार (Police arrested absconding mother and son in dowry and murder case) झालेल्या सासू आणि पतीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. एकविसाव्या शतकात भारत अनेक क्षेत्रात प्रगतीची नवनवी शिखरं पादाक्रांत करत असतानाही हुंडाबळीसारख्या (Evil tradition of dowry) प्रथा समाजात किती घट्ट रुजल्या आहेत, याची प्रचिती देणाऱ्या घटना वारंवार घडत असतात. देशातील अनेक राज्यांमध्ये सतत हुंडाबळीच्या घटना घडत असल्याची नोंद होत असून त्यात तरुणींना मारहाण होणं (Growing cases of dowry death) आणि त्यांचा जीव जाण्याच्या घटना कमी होताना दिसत नाहीत. उत्तर प्रदेशातील अशाच एका घटनेत विवाहितेचा जीव घेऊन फरार झालेल्या पती आणि सासूला पोलिसांनी अटक केली आहे.

काय होतं प्रकरण?

उत्तर प्रदेशातील कानपूरमध्ये आंचल नावाच्या तरुणीचा मृत्यू झाला होता. आपल्या मुलीची हत्या करण्यात आल्याचा आरोप तिच्या आईवडिलांनी केला होता. आंचलला अगोदर ठार मारण्यात आलं आणि नंतर तिने आत्महत्या केल्याचा बनाव रचत तिचा मृतदेह लटकवण्यात आल्याचा आरोप तिच्या आईवडिलांनी केला होता. पोलीस या प्रकरणी पुरावे गोळा करण्याचा प्रयत्न करत होते.

आरोपी फरार

या घटनेनंतर पती सूर्यांश खरबंदा आणि त्याची आई निशा हा गायब झाल्या होत्या. सुनेच्या मृत्यूनंतर हे दोघे अचानक गायब झाल्यामुळे पोलिसांचा संशय बळावला आणि त्यांनी दोघांचा शोध घ्यायला सुरुवात केली. कानपूरवरून हे दोघे लखनऊला गेले होते आणि तिथं आपली ओळख बदलून राहत असल्याचं पोलिसांच्या लक्षात आलं.

माहेरचे नातेवाईक आक्रमक

आंचलच्या मृत्यूनंतर तिच्या माहेरच्या नातेवाईकांनी हा मुद्दा जोरदार उचलून धरत सासरच्या मंडळींना अटक करण्याची मागणी लावून धरली होती. त्यासाठी त्यांनी आंचलचा मृतदेह रस्त्यावर ठेवत तीव्र आंदोलन केलं होतं. पोलिसांनी आरोपींना अटक करून कारवाई करण्याचं आश्वासन दिल्यानंतरच त्यांनी आंदोलन मागे घेत आंचलवर अंत्यसंस्कार केले होते. त्यानंतर पोलिसांनी फरार झालेल्या सूर्यांश आणि त्याच्या आईचा शोध घेत त्यांना अटक केली.

हे वाचा- गूढ! पत्नीचा जळालेला मृतदेह पाहून पतीला धक्का, माहेरच्यांनी केला खुनाचा आरोप

पतीने दिली हत्येची कबुली

पती सूर्यांशने पोलिसांना हत्येची कबुली दिली आहे. पत्नीची हत्या करून आपल्याला मुंबई किंवा दिल्लीला पळून जायचं होतं. त्यासाठीच आपण कानपूरवरून लखनऊला आलो होतो. इथून लवकरच मुंबई किंवा दिल्लीला जाणार होतो, अशी माहिती त्याने पोलिसांना दिली. मात्र त्यापूर्वीच पोलिसांनी अटक केल्यामुळे त्यांचा डाव फसला.

पोलिसांनी सूर्यांश, आई निशासह आठ जणांविरोधात हत्या आणि हुंडाबंदी अधिनियमानुसार गुन्हा दाखल केला आहे. पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत.

First published:

Tags: Crime, Police, Uttar pradesh, Wife and husband