मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /

फेसबूक फ्रेंड दलित असल्याचं कळताच तरुणीकडून बेदम मारहाण, विष पाजलं; तरुणाचा मृत्यू

फेसबूक फ्रेंड दलित असल्याचं कळताच तरुणीकडून बेदम मारहाण, विष पाजलं; तरुणाचा मृत्यू

गौरव कुमार हा दलित असल्याचे समजताच मुलीने कुटुंबीयांसह त्याला मारहाण केली. शिवाय, त्याला बळजबरीने विष पाजण्यात आले. त्यामुळे त्याचा मृत्यू झाल्याचाही आरोप या मुलीवर करण्यात आले आहे.

गौरव कुमार हा दलित असल्याचे समजताच मुलीने कुटुंबीयांसह त्याला मारहाण केली. शिवाय, त्याला बळजबरीने विष पाजण्यात आले. त्यामुळे त्याचा मृत्यू झाल्याचाही आरोप या मुलीवर करण्यात आले आहे.

गौरव कुमार हा दलित असल्याचे समजताच मुलीने कुटुंबीयांसह त्याला मारहाण केली. शिवाय, त्याला बळजबरीने विष पाजण्यात आले. त्यामुळे त्याचा मृत्यू झाल्याचाही आरोप या मुलीवर करण्यात आले आहे.

लखनौ, 6 जून : आपल्या देशाच्या संविधानात धर्मनिरपेक्षता (Secularism) आणि समतेच्या तत्त्वाचा स्वीकार करण्यात आला आहे. भारतामध्ये गेल्या कित्येक दशकांपासून विविध धर्म, जाती आणि पंथाचे लोक गुण्यागोविंदाने राहत आहेत. मात्र, अजूनही काही ठिकाणी जातीभेद (Caste Discrimination) पाळला जातो. जातींसंदर्भात आजही काही लोकांचे विचार इतके कट्टर (Extreme) आहेत की, त्यासाठी खूनदेखील (Murder) होतात. उत्तर प्रदेशातील गौतमबुद्धनगरमध्ये (Gautambuddha Nagar UP) असाच एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. आनंदपूर गावातील गौरव कुमार नावाच्या तरुणाची फेसबुकवर एका मुलीशी मैत्री (Facebook Friendship) झाली. नंतर, गौरव कुमार हा दलित असल्याचे समजताच त्या मुलीने कुटुंबीयांसह गौरव कुमारला मारहाण केली. शिवाय, त्याला बळजबरीने विष (Poison) पाजण्यात आले. त्यामुळे त्याचा मृत्यू झाल्याचाही आरोप या मुलीवर करण्यात आले आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी रिंकीला अटक केली आहे. आज तकने याबाबत वृत्त प्रसिद्ध केलं आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आनंदपूर गावातील गौरव कुमार आणि दनकौर भागातील एका गावातील मुलगी रिंकी यांची दोन वर्षांपूर्वी फेसबुकवर मैत्री झाली होती. गौरवने फेसबुकवर आपल्या नावासमोर गुर्जर (Gurjar) असं लिहिलं होतं. प्रत्यक्षात मात्र तो दलित (Dalit) होता. जेव्हा रिंकीला गौरवची खरी जात समजली तेव्ही ती आणि तिचे कुटुंबीय संतापले.

सिद्धू मूसेवाला हत्या प्रकरणात मोठा ट्विस्ट, शूटर्सचं महाराष्ट्र कनेक्शन समोर; 8 पैकी 2 जण पुण्यातील

23 मे रोजी आरोपी रिंकीने गौरवला दादरी इथं बोलावलं होतं. तिथे तिने कुटुंबीयांसह त्याला बेदम मारहाण केली. त्याला बळजबरीने विषही पाजण्यात आल्याचा आरोप आहे. त्यानंतर गौरवची प्रकृती खालावली. या सर्व प्रकाराची माहिती मिळाल्यानंतर गौरवच्या कुटुंबीयांनी त्याला ग्रेटर नोएडा (Greater Noida) येथील रुग्णालयात दाखल केलं. 24 मे रोजी तिथेच त्याचा मृत्यू झाला. मृत्यूपूर्वी तरुणाने या संपूर्ण प्रकरणाचा व्हिडिओ तयार केला आणि सोशल मीडियावर पोस्ट केला होता. हा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे.

मुंबईतील 'ताज' हॉटेलमध्ये जुगार खेळणाऱ्या 9 व्यावसायिकांना सहा महिन्यांचा कारावास, 11 वर्षांनी शिक्षा

मृत गौरव कुमारच्या कुटुंबीयांनी रिंकी आणि तिच्या कुटुंबातील चार सदस्यांसह एकूण नऊ जणांविरोधात तक्रार दाखल केली होती. मुख्य आरोपी रिंकीला जीटी रोडवरील मिहीर भोज पीजी कॉलेजसमोरून पोलिसांनी अटक केली आहे. अतिरिक्त डीसीपी (DCP) विशाल पांडे यांनी सांगितल्यानुसार, तरुणाच्या हत्येच्या आरोपात मुख्य आरोपी तरुणीला अटक करून कारवाई करण्यात आली आहे. इतर आरोपींना लवकरच अटक करण्यात येईल. जात उघड झाल्यामुळे जीवाला मुकलेल्या या तरुणाच्या उदाहरणावरून अजूनही समाजात जातीभेद जिवंत असल्याचं दिसून येतं. त्याची हत्या करणाऱ्यांना कायद्यानुसार योग्य शिक्षा व्हायला हवी.

First published:

Tags: Crime, Facebook, Friendship, Murder, Uttar pardesh