रायपूर, 2 जानेवारी: पार्टी (Party) सुरु असताना झालेल्या किरकोळ वादातून (Ordinary issue) मित्रानेच सख्ख्य़ा (Close friend) मित्राचा खून (Murder) केल्याची घटना समोर आली आहे. मूळचा गुंड (Criminal) असणाऱ्या मित्राला त्याच्या मित्राच्या एका कृत्याचा राग आला आणि थेट त्याच्या छातीत खंजीर खुपसून त्याने जीव घेतला. या घटनेनं एकच खळबळ उडाली आणि एकमेकांचा बदला घेण्याचं सत्रच सुरू झालं.
अशी घडली घटना
छत्तीसगडमधील भिलाईमध्ये 31 डिसेंबरच्या पार्टीत आरोपी केतन उर्फ टोलू बाग आणि त्याचा मित्र प्रिन्स डोंगरे आले होते. इतर मित्रांसोबत जोरदार पार्टी सुरू होती. अचानक रात्री दहा वाजण्याच्या सुमाराला केतन प्रिन्सचा हात पकडून त्याला बाजूला घेऊन गेला. फार शहाणपणा करतोस, असं म्हणत त्याने खंजीर काढला आणि मित्राच्या छातीत खुपसला. खंजिराचा खोलवर वार झाल्यामुळे प्रिन्स जागेवरच कोसळला. इतर मित्रांनी त्याला तातडीनं हॉस्पिटलमध्ये दाखल केलं. मात्र तिथं डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं.
हॉस्पिटलमध्ये तोडफोड
या घटनेनंतर प्रिन्सच्या नातेवाईकांनी एकच गोंधळ घातला आणि हॉस्पिटलमध्ये तोडफोड केली. हॉस्पिटलमध्ये यामुळे तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. प्रिन्सचे मित्र आणि नातेवाईक यांनी हॉस्पिटलमध्ये गर्दी केली होती आणि त्याच्या मृत्यूच्या बातमीनंतर जोरदार गोंधळ घातला.
हे वाचा- भटक्या कुत्र्यांनी चिमुकल्याचे तोडले लचके; 18 ठिकाणी चावा घेत केलं रक्तबंबाळ
केतनच्या घरी हल्ला
आरोपी केतनच्या घरी प्रिन्सचे मित्र आणि नातेवाईक यांनी हल्लाबोल करत जोरदार गोंधळ घातला. केतनला पकडून जबर मारहाण करण्यात आली. नातेवाईकांचं उग्र रूप पाहून केतनच्या घरच्यांनी तिथून पळ काढला. मात्र केतनला पकडून प्रिन्सच्या मित्रांनी जोरदार धुलाई केली. पोलीस घटनास्थळी दाखल झाले, मात्र तरीही लोक पोलिसांना केतनपर्यंत पोहोचू देत नव्हते. त्यांच्यावर काही नातेवाईकांनी दगडफेकही केली. पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून केतनला अटक केली आहे. केतनवर याअगोदर खुनाच प्रयत्न केल्याचा गुन्हाही दाखल आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Chattisgarh, Crime, Murder, Police