कल्याण, 02 जानेवारी: कल्याण (kalyan) पूर्वेकडील द्वारली गावात एका 4 वर्षीय अल्पवयीन मुलावर भटक्या कुत्र्याच्या टोळक्याने हल्ला (stray dogs attack on minor boy) केला आहे. घराच्या बाजलाच मोकळ्या जागेत खेळत असताना, तीन ते चार भटक्या कुत्र्यांनी चिमुकल्यावर हल्ला केला आहे. पीडित मुलाच्या किंचाळ्या ऐकून आसपासच्या नागरिकांनी घटनास्थळी घाव घेतली. त्यामुळे मोठी जीवितहानी टळली आहे. पण तोपर्यंत कुत्र्यांनी चिमुकल्याला तब्बल 18 ठिकाणी चावा घेत रक्तबंबाळ केलं होतं. चिमुकल्यावर सध्या कळवा येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. कल्याण पूर्वेकडील द्वारली गावात ही घटना समोर आली आहे. द्वारली गावातील सुहास निंबोरे हे आपल्या कुटुंबासह आदित्य अपार्टमेंटमध्ये राहतात. काल सायंकाळी त्यांचा चार वर्षाचा मुलगा तुषार हा इमारतीच्या मागील बाजूस असलेल्या मोकळ्या परिसरात खेळत होता. यावेळी तीन ते चार भटक्या कुत्र्यांनी तुषारच्या दिशेनं धाव घेतली आणि काही कळायच्या आत तुषारवर हल्ला केला. हेही वाचा- क्लासला आलेल्या अल्पवयीन मुलीला बनवलं वासनेचं शिकार; शिक्षकाचं धक्कादायक कृत्य कुत्र्याने हल्ला केल्यानंतर चार वर्षीय चिमुकला जीवाच्या आकांताने ओरडू लागला, यावेळी आसपासच्या नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि तुषारची कुत्र्यांच्या तावडीतून सुटका केली. मात्र तोपर्यंत कुत्र्यांनी तुषारच्या शरीराल तब्बल 18 ठिकाणी चावा घेतला होता. तुषारच्या कुटुंबीयांनी त्याला तातडीने डोंबिवली येथील शास्त्रीनगर रुग्णालयात उपचारासाठी नेले. मात्र याठिकाणी डॉक्टर उपलब्ध नव्हते, त्यामुळे त्याला कळवा येथील शासकीय रुग्णालयात हलवण्यात आलं. याठिकाणी तुषारवर उपचार सुरू आहेत. हेही वाचा- पुण्यात इंजिनिअर मुलाकडून आईचा निर्घृण खून, आधी औषधांचा ओव्हर डोस दिला मग…, विशेष म्हणजे, गेल्या नऊ महिन्याच्या काळात कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात एकूण 9 हजार 44 जणांना कुत्र्याने चावा घेतला आहे. म्हणजेच कल्याण डोंबिवली परिसरात दर महिन्याला तब्बल एक हजार नागरिकांना भटक्या कुत्र्यांनी चावा घेतला आहे. त्यामुळे महापालिका क्षेत्रात भटक्या कुत्र्यांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.