मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /1947 साली ती हत्या कोणी केली? 500 लोकांनी मान्य केलाय गुन्हा, पण अद्याप खऱ्या आरोपीचा शोध सुरुच

1947 साली ती हत्या कोणी केली? 500 लोकांनी मान्य केलाय गुन्हा, पण अद्याप खऱ्या आरोपीचा शोध सुरुच

ब्लॅक दाहिला मर्डर केस (Black Dahlia Murder Case) या 1947 मध्ये झालेल्या हत्येच्या घटनेनं संपूर्ण अमेरिकेत खळबळ उडाली होती.आतापर्यंत 500 हून अधिक लोकांनी ब्लॅक दाहिलाच्या हत्येचा गुन्हा कबुल केला आहे.

ब्लॅक दाहिला मर्डर केस (Black Dahlia Murder Case) या 1947 मध्ये झालेल्या हत्येच्या घटनेनं संपूर्ण अमेरिकेत खळबळ उडाली होती.आतापर्यंत 500 हून अधिक लोकांनी ब्लॅक दाहिलाच्या हत्येचा गुन्हा कबुल केला आहे.

ब्लॅक दाहिला मर्डर केस (Black Dahlia Murder Case) या 1947 मध्ये झालेल्या हत्येच्या घटनेनं संपूर्ण अमेरिकेत खळबळ उडाली होती.आतापर्यंत 500 हून अधिक लोकांनी ब्लॅक दाहिलाच्या हत्येचा गुन्हा कबुल केला आहे.

नवी दिल्ली 14 जून: जगभरात हत्या, चोरी आणि गुन्हेगारीची अशी अनेक प्रकरणं आहेत, जी पोलीस आणि तपास यंत्रणाही सोडवू शकत नाहीत. यात अनेक अशा हत्येच्या घटना आहेत, ज्या कित्येक वर्षांपासून केवळ एक रहस्य (Murder Mystery) बनून राहिल्या आहेत. कारण, आजपर्यंत हत्या करणाऱ्या आरोपींचा तपास लागलेला नाही. असंच एक प्रकरण आहे अमेरिकेतील ब्लॅक दाहिला मर्डर केस (Black Dahlia Murder Case). 1947 मध्ये झालेल्या या हत्येच्या घटनेनं संपूर्ण अमेरिकेत खळबळ उडाली होती. हे प्रकरण लॉस एंजेलिसमधील सर्वात जुन्या आणि न सोडवता आलेल्या मर्डर केसपैकी एक मानलं जातं.

लांब केस ठेवणंही गुन्हा? पाकिस्तानी कलाकाराला झालेल्या अटकेमुळे उडाला गोंधळ

अमेरिकेच्या बोस्टनमधील रहिवाशी असलेल्या एलिजाबेथ शॉर्ट त्यांना ब्लॅक दाहिला नावानंही ओळखलं जात असे. 9 जानेवारी 1947 रोजी त्या अचानक गायब झाल्या होत्या यानंतर पाच दिवसांनी म्हणजेच 15 जानेवारीला त्यांचा मृतदेह मिळाला होता. त्यांचा मृतदेह कमरेपासून तुटलेला होता, सोबतच शरीरावरही अनेक जखमा होत्या. आरोपीनं त्यांचा चेहरा धारदार हत्यारानं कानापर्यंत चिरला होता. ही हत्या लॉस एंजेलिसमध्ये झाली होती. बऱ्याचदा गुन्हेगार आपला गुन्हा मान्य करण्यापासून वाचत असतात मात्र हत्येचं हे प्रकरण अगदीच वेगळं होतं.

Corona Virus: चीनच्या वुहान लॅबमधून समोर आली मोठी माहिती

या प्रकरणात सुरुवातीच्या तपासात तब्बल 60 जणांनी या हत्येचा गुन्हा कबुल केला होता. मात्र, त्यांचा गुन्हा कधीही सिद्ध होऊ शकला नाही. त्यामुळे, त्यांना सोडून देण्यात आलं. हैराण करणारी बाब म्हणजे, आतापर्यंत 500 हून अधिक लोकांनी ब्लॅक दाहिलाच्या हत्येचा गुन्हा कबुल केला आहे. सगळ्यात जास्त हैराण करणारी गोष्ट म्हणजे, गुन्हा मान्य करणाऱ्या लोकांमधील अनेकांचा तर दाहिलाची हत्या झाली तेव्हा जन्मही झाला नव्हता. यामुळे, अनेकांवर न्यायालयाची दिशाभूल केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. एलिजाबेथ शॉर्ट यांची हत्या अमेरिकेच्या इतिहासातील सर्वात क्रूर आणि न उलगडलेली मर्डर केस आहे. कारण, आरोपीचा अजूनही तपास लागलेला नाही. या हत्याकांडावर अनेक पुस्तकंही लिहिली गेली आहेत.

First published:
top videos

    Tags: Murder Mystery, Murder news