चीन, 14 जून: सध्या संपूर्ण जग कोरोना व्हायरससारख्या महामारीचा सामना करत आहे. गेल्या एक वर्षभरापासून कोरोनाला आटोक्यात आणण्यासाठी जगातले अनेक देश प्रयत्न करत आहेत. त्यातच हा व्हायरसची निर्मिती चीनमधून झाली असल्याचा दावा करण्यात येत आहे. दरम्यान आताही एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. चीन (China)च्या वुहान इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी (Wuhan Institute of Virology) मध्ये वटवाघूळ पिंजऱ्यात (Bats in Cages) बंद करुन ठेवले असल्याची धक्कादायक बाब उघड झाली आहे.
लॅबमधील एक फोटो समोर आला आहे, त्यात ही बाब समोर आली आहे. दरम्यान जागतिक आरोग्य संघटना (WHO) नं हा दावा फेटाळला आहे. WHO नं यावर प्रतिक्रिया दिली की, लॅबमध्ये पिंजऱ्यात वटवाघूळ ठेवणं हे बोलणं केवळ एक षड्यंत्र आहे. वुहानच्या लॅबमध्ये कोरोना व्हायरस तयार करुन तो जगभर पसरला असं वारंवार म्हटलं जातं.
मे 2017 ला वुहान लॅब (Wuhan Lab) मध्ये नव्या बायोसेफ्टी लेव्हल 4 लॅबोरेटरीच्या लॉन्चवेळी एका चीनी विज्ञान अॅकॅडमीच्या व्हिडिओत दुर्घटना झाल्यास सुरक्षेबाबतची खबरदारी सांगण्यात आली आहे. इतकंच काय तर या व्हिडिओत या लॅबच्या बांधकामादरम्यान फान्सच्या (French Government) सरकारसोबत भांडणंही झाल्याचं नमूद आहे. तसंच या व्हिडिओत वुहान लॅबमध्ये पिंजऱ्यात वटवाघूळ ठेवण्यात आल्याचंही दिसतं. चिनी शास्त्रज्ञ त्यांना किडे खायला घालतानाही दिसत आहेत.
हेही वाचा- बेपत्ता मुलगी सापडली, अपहरणकर्त्याचा उद्देश ऐकून तुम्हालाही बसेल धक्का
यावर WHO काय म्हणाले...
स्काय न्यूजच्या रिपोर्टनुसार, 10 मिनिटांच्या या व्हिडिओला वुहान इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी, चायनीज अॅकॅडमी ऑफ सायन्सेजचे वुहान पी4 लॅबोरेटरीची निर्मिती आणि रिसर्च टीम, असं नाव देण्यात आलं आहे. या व्हिडिओत लॅबमधील अव्वल वैज्ञानिकांच्या मुलाखतीही आहेत. कोरोनाव्हायरसच्या उत्पत्तीच्या तपासणीसंदर्भात WHOच्या अहवालात वुहान लॅबमध्ये कुठल्याही प्रकारचे वटवाघूळ ठेवलं नसल्याचं नमूद केलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: China, Coronavirus, Wuhan