Home /News /crime /

लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या कपलचे भांडण विकोपाला, प्रियकराने प्रेयसीलाच संपवलं!

लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या कपलचे भांडण विकोपाला, प्रियकराने प्रेयसीलाच संपवलं!

राजस्थानमधील कोचिंग शहर कोटा येथे लिव्ह-इन-रिलेशनशिपमध्ये (Live-in-relationship) असलेल्या प्रेयसीच्या तिच्याच प्रियकराने हत्या (Boyfriend killed his Girlfriend) केल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे.

    कोटा, 11 मे : राजस्थानमधील कोचिंग शहर कोटा येथे लिव्ह-इन-रिलेशनशिपमध्ये (Live-in-relationship) असलेल्या प्रेयसीची तिच्याच प्रियकराने हत्या (Boyfriend killed his Girlfriend) केल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. मागील काही दिवसांपासून त्या दोघांमध्ये छोट्या छोट्या कारणांवरुन भांडण होत होते. यानंतर मंगळवारी प्रेयसी मृतावस्थेत आढळून आली. याप्रकरणी मृत तरुणीच्या नातेवाईकांनी तिच्या प्रियकराविरोधात तक्रार दिली आहे. यानंतर पोलिसांनी आरोपीला अटक केली. तरुणीच्या मृतदेहाचे शवविच्छेदनानंतर तो कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आला आहे. ही घटना कोटा येथील उद्योग नगर ठाणे परिसरातील कंसुआ येथे घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काजल मेघवाल असे 27 वर्षीय मृत तरुणीचे नाव आहे. ती अविनाश बैरागीसोबत मागील दीड वर्षांपासून लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होती. मंगळवारी तिचा मृतदेह आढळून आला. तिच्या कानाखाली जखमा होत्या आणि रक्तस्त्राव होत होता. नातेवाइकांच्या तक्रारीवरून पोलिसांनी अविनाश बैरागीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करून त्याला अटक केली. सहा वर्षांपूर्वी झाले होते लग्न काजल 3 बहिणी आणि 2 भावांमध्ये दुसऱ्या नंबरची होती. काजलचे वडील पोलीस कॉन्स्टेबल आहेत. तिची मोठी बहीण ज्योती हिने सांगितले की, काजलचे शिक्षण दहावीपर्यंत झाले होते. सहा वर्षांपूर्वी तिचे लग्न झाले होते. ती आपल्या पतीसोबत स्टेशन परिसरात राहत होती. याचदरम्यान, अविनाश बैरागी तिच्या संपर्कात आला. यानंतर अविनाशने तिच्या पतीला मारहाण करुन त्याला पळवून लावले आणि काजलला धमकावून त्याच्यासोबत ठेवून घेतले. यानंतर मागील दोन वर्षांपासून ते दोघे लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये होते. दोन महिन्याआधी ते कंसुआ परिसरात भाड्याच्या घरात राहायला आले होते. अविनाश अमली पदार्थांचा व्यवसाय करतो (गांजा-चरस विकतो) आणि बहिणीला मारहाण करत असे, असा आरोप ज्योतीने केला आहे. हे वाचा - नात्यापेक्षा कर्तव्य महत्त्वाचं! महिला पोलीस अधिकाऱ्याने स्वतःच्याच होणाऱ्या पतीला केली अटक काजलच्या दरवाजा बाहेरुन लावला होता आणि आत तिचा मृतदेह पडलेला होता. तिच्या कानातून रक्त वाहत होते. तसेच चेहऱ्यावर आणि डोक्यावर जखमेच्या खुणा होत्या. हे वार कोणत्या हत्याराने करण्यात आले आहेत, हे तपासात स्पष्ट होणार आहे. याप्रकरणी उद्योगनगर पोलीस ठाणे अधिक तपास करत आहे.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Crime news, Murder, Rajasthan, Relationship

    पुढील बातम्या